शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

२० लाखांसाठी साकोलीचे अग्निशमन वाहन अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 5:00 AM

गत चार महिन्यांपासून साकोली नगरपरिषद हा वाद पेटला आहे. मात्र यावर अजूनपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही. सध्या साकोली येथे मुख्याधिकारी माधुरी मडावी रूजू झाल्या आहेत. शिस्तबध्दता व नियमांचे कायदेशीर पालन करत नगरपरिषदेचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांमध्ये नाराजी : प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : येथील नगरपरिषदेत वादग्रस्त ठरलेली अग्नीशमन वाहन आताही २० लाख रूपयांसाठी सोलापुरातच अडले आहे. त्यामुळे नगरपरिषद आता २० लाख रूपये देणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अग्नीशमन वाहन खरेदी झाली आणि साकोली नगरपरिषदेत एकच वादळ उठले. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी विरोधात सर्व नगरसेवक एक झाले. प्रकरण एवढे तापले की या प्रकरणात नगराध्यक्षांना रजेवर जावे लागले आणि तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांचे तडकाफडकी स्थानांतरण करण्यात आले. याला कारणही तसेच घडले. सदर वाहनाच्या खरेदीसाठी एकाही सभापती व नगरसेवकांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्याची साधी कल्पनाही देण्यात आली नाही. नियमबाह्य पद्धतीने अग्नीशमन वाहनाची खरेदी करण्यात आली. नगरपरिषदेतर्फे त्या वाहनासाठी आतापर्यंत ७२ लक्ष रूपये देण्यात आले. त्याचीही कल्पना नगरसेवकांना नव्हती.गत चार महिन्यांपासून साकोली नगरपरिषद हा वाद पेटला आहे. मात्र यावर अजूनपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही. सध्या साकोली येथे मुख्याधिकारी माधुरी मडावी रूजू झाल्या आहेत. शिस्तबध्दता व नियमांचे कायदेशीर पालन करत नगरपरिषदेचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्यातरी भ्रष्टाचाराला वाव नाही. म्हणून या प्रकरणात अधिकच अडचण निर्माण झाली आहे. ३० एप्रिल रोजी आरटीओ कार्यालय भंडारा येथून सोलापूर येथे ठेवलेली अग्नीशमन वाहन रजिस्ट्रेशन करण्यात आले. मात्र रजिस्ट्रेशन झाल्यानंतर व आज १५ दिवसांचा कालावधी लोटला मात्र वाहन साकोली येथे आलेच नाही.सदर वाहनाची खरेदी ही ९२ लक्ष रूपयात करण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत ७२ लक्ष रूपये देण्यात आले असून अद्यापही साकोली नगरपरिषदेला २० लक्ष रूपये देणे बाकी आहे. सदर वाहन बीएस फोर प्रकारचे असल्याने त्या वाहनाला ३० एप्रिलपर्यंतच रजिस्ट्रेशन करण्याची वेळ होती. त्यामुळे ते पूर्ण पैसे मिळण्यापुर्वीच रजिस्ट्रेशन करण्यात आले. मात्र आता २० लक्ष रूपयांसाठी सदर वाहन सोलापूरात थांबले आहे. ते साकोली येथे कधी येणार, हा प्रश्नच आहे.