शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात भारनियमनाची ‘कुऱ्हाड’

By admin | Updated: January 12, 2015 22:44 IST

उन्हाळी धानपिक डौलात उभे असण्याच्या काळात ग्रामीण क्षेत्रातील शेतकऱ्यांवर भार नियमनाची कुऱ्हाड कोसळली आहे. कुठे १६ तर कुठे ४ तासांचे भारनियमन करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना

भंडारा : उन्हाळी धानपिक डौलात उभे असण्याच्या काळात ग्रामीण क्षेत्रातील शेतकऱ्यांवर भार नियमनाची कुऱ्हाड कोसळली आहे. कुठे १६ तर कुठे ४ तासांचे भारनियमन करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे वीज बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने वीज जोडणी कापण्याचा सपाटा सुरु केला आहे. पवनी, लाखांदूर यासारख्या चौरस पट्यात जवळपास २५ हजार कृषीपंप आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानसह कठान मालाचे उत्पादन घेतले जाते. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना कृषि पंपाचा मोठा आधार आहे. मात्र थ्री फेस व सिंगल फेस योजना असलेल्या भागात १० ते १६ तासांचे भारनियमन केले जात आहे. यात सावरला, गोसे, भावड, कोंढा, पिंपळगांव, विरली, पालोरा, तुमसर तालुक्यातील सिहोरा, बपेरा, चांदपूर, मोहाडी तालुक्यातील चिचखेडा, पार्डी, मोहाडी या फिडर अंतर्गत ८ ते १६ तासांचे भारनियमन होत आहे. तसेच भंडारा तालुक्यातील पहेला, वाकेश्वर, ढोलसर, मोहाडी तालुक्यातील आंधळगांव, ढोल, करडी, बेटाळा, पवनी तालुक्यातील मांगली, कोंढा, लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर, खैरी, साकोली तालुक्यातील सौंदड, विरली गावठाण, गोंडउमरी, किरमटी, वडद, सातलवाडा, लाखनी तालुक्यातील पोहरा, रेंगेपार, पटाचिटोली, लाखोरी, एकोडी, बोदरा, राजेगांव, सालेभाटा, मुरमाडी फिडरमध्ये भारनियमन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)