शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात मंडईची रेलचेल

By admin | Updated: October 25, 2014 01:01 IST

दिवाळी सण उत्सवाचा, आनंदाचा, दिव्यातील उजळणाऱ्या पणतीचा सण, झगमगाट, रोषणाई आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात सुरु होणाऱ्या मंडई उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी.

रंजित कांबळे मोहदुरादिवाळी सण उत्सवाचा, आनंदाचा, दिव्यातील उजळणाऱ्या पणतीचा सण, झगमगाट, रोषणाई आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात सुरु होणाऱ्या मंडई उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी. पाच दिवसांचा दिवाळी सण आटोपताच मंडई उत्सवाची धामधुम सुरू होणार आहे. परिणामी ग्रामीण भागात जत्रेचा माहोल दिसणार आहे.तस बघितले तर दिवाळी उत्सवाची खरी मजा ही ग्रामीण भागात आयोजीत होणाऱ्या मंडई उत्सवाची असते. दिवाळी सण सुरु होताच ग्रामीण भागात मोठया प्रमाणात मंडईला सुरुवात होत असते. मंडई निमित्त नागरिकांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्वात जास्त झाडीपट्टीतील नाटकांना म्हणजेच संचाच्या नाटकांना प्रेक्षकांची पहिली पसंती असते. त्याचबरोबर तमाशा, दंडारी, आमदंगल आणि आंबट शौकीनासाठी हंगामे आयोजीत केले जातात. काही का असोना पण मंडई उत्सवामुळे कलावंताना त्यापासून मोठया प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत असते. मंडईला डेकोरेशनची मागणी सुद्धा मोठया प्रमाणात असते. महिनाभरापासून डेकोरशन बुक केले जात असते.मंडईला पाहुण्याचे आदान - प्रदान होत असते. नातलग एकमेकांच्या गावी मंडईनिमित्त का होईना पण भेटीगाठी घेत असतात. लहान मुलापासून तर तरुण, मोठयांना मंडईचे खास आकर्षण दिसून येते. विशेष करुन तरुण मुला - मुलींना मंडई उत्सव मोठी पर्वणीच घेऊ न येणारा ठरतो. मंडई उत्सव तरुण- मुला - मुलीसाठी भावी जोडीदाराची निवड करण्याचे एक केंद्रस्थान सुद्धा मंडईला ग्रामीण भागात विशेष असे महत्व दिसून येते. दिवाळी सण सर्वासाठी आनंदाचे, उत्सवाचे आणि हर्षोल्लास घेऊ न येणारा सण असतो. आणि त्यात मंडई उत्सव ग्रामीण नागरिकांसाठी आनंदाचे पर्वणीच घेणारा ठरत असतो. पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या या मंडई उत्सवाची मजा काही वेगळीच असते हे मात्र विशेष.ग्रामीण भागात मंडईला विशेष महत्व असते. सकाळ सत्रापासूनच आप्तस्वकीयांचे येणे-जाणे सुरू होते. विशेष म्हणजे सोयरकीच्या कामांना विशेष प्राधान्य दिले जाते. दिवाळीचा फटाका फुटताच सुयोग्य वर-वधू यांच्या लग्नाचा बार उडविण्याचा बेत आखला जातो. त्यात मंडईच्या बहाण्याने भेटी-गाठी वाढविण्यावर भर दिला जातो. त्यातूनच मोठ्या प्रमाणात संबंध वाढीला लागतात. दरम्यान या उत्सवाच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल सुद्धा होत असते.