प्रवेशासाठी ग्रामीण भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST2021-06-18T04:25:14+5:302021-06-18T04:25:14+5:30

वाकेश्वर : काेराेना संकटामुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र ऑनलाईन शिक्षणात संपले. आता नवीन प्रवेशासाठी ग्रामीण भागात गुरुजींची धावपळ सुरू झाली ...

In rural areas for admission | प्रवेशासाठी ग्रामीण भागात

प्रवेशासाठी ग्रामीण भागात

वाकेश्वर : काेराेना संकटामुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र ऑनलाईन शिक्षणात संपले. आता नवीन प्रवेशासाठी ग्रामीण भागात गुरुजींची धावपळ सुरू झाली आहे. तुकडी टिकविण्यासाठी खासगी शाळा व्यवस्थापनाचा दबाव वाढत असून, ग्रामीण भागात काेराेना संकटात गुरुजींची विद्यार्थी शाेधमाेहीम सुरू आहे. काेराेना महामारीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. या वर्षी वर्ग एक ते आठच्या सर्व विद्यार्थ्यांना आरटी ॲक्ट २००९, कलम १६ नुसार वर्गाेन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. काेराेनाच्या सावटात हेही सत्र संपले. नव्या सत्राला प्रारंभ हाेणार आहे. नवीन वर्गात प्रवेशभरतीसाठी दरवर्षीप्रमाणेच गुरुजींची धावपळ सुरू झालेली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना शाळेतून टीसी मिळत आहे, त्या गावामध्ये शिक्षक दाखल हाेत आहेत. विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत प्रवेश घेण्यासाठी विविध प्रलाेभने दिले जात आहेत. आमची शाळा किती चांगली आहे हे पालकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षकांमध्येही स्पर्धा पाहावयास मिळत आहे. विशेषत: खासगी शाळांतील शिक्षकांमध्ये ही स्पर्धा अधिक तीव्र स्वरूपाची असते. खासगी शाळांची संख्या जास्त व विद्यार्थ्यांची संख्या कमी अशी स्थिती आहे. शासनमान्य तुकडी तुटून शिक्षक अतिरिक्त हाेण्याची भीती असते. तसेच नवीन शाळा अनुदानाच्या टप्प्यावर आलेल्या आहेत. त्यांनाही विद्यार्थ्यांची गरज असते. त्यामुळे संस्थाचालक शिक्षकांवर दबाव आणत आहेत. काेराेना संकटात शिक्षक गावागावांत भटकंती करीत आहेत.

Web Title: In rural areas for admission