शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

विरली परिसरात गारपिटीच्या तडाख्याने रबी पिके मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST

शुक्रवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र रात्री आठच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाला प्रारंभ झाला. गत महिनाभरापासून दर एक- दोन दिवसांनी सातत्याने बरसणाऱ्यां पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल। नुकसानभरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली परिसरात शुक्रवारी रात्री आठ वाजता सुमारास गारपिटीसह वादळी पाऊस आला. यावेळी सुमारे १५ मिनीटे गारांचा वर्षाव झाला. या गारपिटीच्या तडाख्याने रबी पीके मातीमोल झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
शुक्रवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र रात्री आठच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाला प्रारंभ झाला. गत महिनाभरापासून दर एक- दोन दिवसांनी सातत्याने बरसणाऱ्यां पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत.
सध्या लाख, लाखोळी, वाटाणा, हरभरा, गहू आदी पिके काढणीचा हंगाम जोमात सुरु आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रबी पिकांच्या कडपा पसरलेल्या आहेत. तर काही शेतकºयांच्या शेतात कडपा जमा करुन ढिग तयार झाले आहेत. मात्र वारंवार बरसणाऱ्या पावसाने या कडपा भिजत असून वाटाणा, हरभरा अंकुरण्याच्या मार्गावर आहेत. या कडपा पलटवून वाळविणे आणि पुन्हा पावसाने ओला होणे, असा प्रकार सुरु असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
दुसरीकडे पिकांच्या कडपा जमा करुन तयार झालेल्या ढिगांवर ताडपत्री, पॉलिथीन आदी झाकून पीक वाचविण्याचा शेतकरी केविलवाणा प्रयत्न करीत आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे या ताडपत्र्या उडून जात असून पिकांचे ढिगही ओले होत आहेत. परिणामी शेतात जमा झालेली पिकेही सडण्याच्या मार्गावर आहेत. जी काढणी योग्य पिके शेतात उभी आहेत ती सातत्याने बरसणाºया पावसाने काळवंटली आहे. उभ्या पिकांचे गारपिटीच्या तडाख्याने अतोनात नुकसान झाले आहे.
या रबी हंगामात दर एक- दोन दिवसांनी सातत्याने बरसणाºया पावसाने रबी पिके मातीमोल झाली असून निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंड्यातून घास हिरावून घेतला आहे. दरम्यान, या हंगामातील अवकाळी पावसाच्या तडाख्याने रबी पिकाचंी झालेली हानी लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

शेतकऱ्यांची संकटाची मालीका सुरुच
खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या वक्रदृष्टीने उत्पादनात कमालीची घट झाली. धान खरेदीसाठी रांगा लावण्यात आल्या. काटसकरीनंतर धानाची विक्री झाली. मात्र चुकारे अद्यापही अडले आहे. सदर संकट सुरु असतानाच रबी पिकावर अवकाळी पावसाने भर घातली. त्यामुळे शेतकऱ्यांवर येणारे संकट वाढतच आहे.