शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

बोथली-पांजरा येथे रोहयो कामात गैरप्रकार

By admin | Updated: September 20, 2014 23:45 IST

तालुक्यातील बोथली-पांजरा ग्राम पंचायत अंतर्गत रोहयो कामात रोजगार सेवकाने गैरप्रकार केल्याचे निदर्शनात आले आहे. रोजगार सेवक विक्रम तितीरमारे यांनी रोजगार हमी योजनेच्या हजेरी बुकवर

तथागत मेश्राम - वरठीतालुक्यातील बोथली-पांजरा ग्राम पंचायत अंतर्गत रोहयो कामात रोजगार सेवकाने गैरप्रकार केल्याचे निदर्शनात आले आहे. रोजगार सेवक विक्रम तितीरमारे यांनी रोजगार हमी योजनेच्या हजेरी बुकवर बोगस मजुराची नावे नोंदवून त्यांच्या नावावर पैशाची उचल केली. कामावर हजर मजुरांची नावे वगळली असून अनेकांची मजुरी मिळाली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. यात मृत महिलेला कामावर हजर दाखवून एका महिलेला प्रसुतीच्या दुस-या दिवशी कामावर दाखवण्यात आले आहे. या संदर्भात पुराव्यासोबत तक्रार करुनही कारवाई झाली नाही. त्यामुळे तक्रारकर्ते आंदोलनाच्या तयारीत आहेत.बोथली-पांजरा ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्षापासून विक्रम तितीरमारे रोजगार सेवक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्याकाळात झालेल्या अनेक कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार गावक-यांनी केली आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर हजर मजुराचे २०१२ पासून मजुरी मिळाली नाही. पण त्यांचा नावाने मंजुर निधीतून पैशाची उचल झाल्याचे समजते. यात एकूण २९ मजुराचा समावेश आहे. याना २०१२ पासुन मजुरीचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.रोजगार हमी योजना ही गावातील शेतमजुर व रोजगार इच्छुक लोकांना कामासोबत दाम देणारी शासनाची सर्वोत्कृष्ट योजना आहे. या अंतर्गत ठेकेदारी पध्दतीला लगाम लावून गावाचा विकास गावक-यांच्या कष्टातून व त्यासाठी त्यांना मोबदला म्हणून पैसा अशी योजना आहे. पण यात ही वाढलेल्या गैरप्रकारामुळे या योजनेला ग्रहण लागले आहे. कामावर लक्ष ठेवण्यासाठी रोजगार सेवक, त्यावर ग्राम पंचायतचे नियंत्रण आणि यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तालुकास्तरावर असलेले पंचायत विभाग, त्यानंतरही निर्माण होणारे घोळ हे सर्वांच्या सहभागावर सहमती असल्याचे दिसते. मजुरांनी तक्रार करुनही चौकशी न झाल्यामुळे या प्रकरणाचे मुळे खोलवर रुजल्याचे दिसते. या प्रकरणात दोषी रोजगार सेवकासह ग्राम सेवक व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. पण ज्या विभागाकडे हे काम आहे. त्या विभाग प्रमुखाला चौकशी अधिकारी असल्यास आरोप कसे सिध्द होतील, असा प्रश्न गावकऱ्यांनी केला आहे. एक महिण्यापासून तक्रार देऊनही चौकशी न झाल्यामुळे गावकऱ्यांत रोष आहे.मस्टर रजिस्टरमध्ये घोळरोजगार सेवक विक्रम तितीरमारे यांच्या कार्यक्रमात झालेल्या अनेक कामाच्या मस्टर रजिस्टरमध्ये घोळ असल्याचे उजेडात आले आहे. कामावर गैरहजर मजुरांना हजर व हजर मजुरांना गैरहजर दाखविण्यात आले. यात रामदास वैद्य, सुस्वता मते, हिरामण माटे, जितेंद्र वैद्य, ओमप्रकाश गाढवे, राकेश वैद्य, सुनंदा तितीरमारे हे कामावर नसतानाही त्यांच्या नावे मजुरी काढण्यात आली आणि मनीष शेंडे, दामू माटे, गुलाब बाभरे, प्रमोद माटे, जगदीश बाभरे, महादेव जगनाडे, शिला माटे, प्रभावती वैद्य यांना हजर असूनही गैरहजर दाखवण्यात आल्याची सरपंच यांच्या तक्रारीत नमूद आहे. कामावर हजर दाखवलेल्या काही मजूर हे वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत कामावर जातात तर काही दुसरीकडे कामावर आहेत. यात अरुण घोडेस्वार, चंद्रशेखर वैद्य, महादेव माटे व सुधीर बाभरे यांचा समावेश आहे. त्यांना रोहयोचे मजूर म्हणून दाखविण्यात आले आहे. मस्टर बुकवरील घोळ संपत नाही. कॅन्सर आजाराने ग्रस्त महिलेला दि.१४ ते २० मे पर्यंत कामावर हजर दाखवण्यात आले. त्याचबरोबर सुलोचना माटे नामक विवाहितेला प्रसूतीच्या दोन दिवसानंतर हजर दाखविण्यात आले. त्यांची प्रसूती ३ मे रोजी झाली. त्यांना ६ ते १२ मेपर्यंत कामावर हजर दाखवण्यात आले. सुलोचना माटे यांचा मस्टर क्रमार ४४३३ व गीता वैद्य यांना क्रमांक ४५८८ नोंद आहे.