शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नूतनीकरणाऐवजी रस्त्याची डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

रस्त्याच्या बाबतीत भंडारा शहर तेवढे नशीबवान नाही. जिल्हा परिषद चौक ते शितलामाता मंदिरपर्यंतचा रस्ता भंडारा - रामटेक महामार्ग अंतर्गत विकसीत करण्यात आला आहे. या मार्गाचे विस्तारीकरण झाले आहे. यापुढील टप्प्यात खात रोड ते रामटेकपर्यंतच्या रस्ता विस्तारीकरणाचे कार्य पूर्ण झाले आहे. मात्र शितलामाता मंदिर ते खांबतलाव चौकापर्यंतचा रस्ता बांधकामाला अजूनही सुरुवात झाली नाही.

ठळक मुद्देभंडारातील प्रकार : दुरुस्ती केल्यानंतरही नागरिकांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील काही मुख्य व अंतर्गत रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. त्यातही बायपास रस्त्याची अवस्था बिकट झाली असतांना त्या रस्त्याचे नुतनीकरण करण्याऐवजी डागडुजी केली जात आहे. भंडारा शहरातील खांबतलाव चौक ते शास्त्री चौक मार्गाची ही डागडुजी केली जात आहे.रस्त्याच्या बाबतीत भंडारा शहर तेवढे नशीबवान नाही. जिल्हा परिषद चौक ते शितलामाता मंदिरपर्यंतचा रस्ता भंडारा - रामटेक महामार्ग अंतर्गत विकसीत करण्यात आला आहे. या मार्गाचे विस्तारीकरण झाले आहे. यापुढील टप्प्यात खात रोड ते रामटेकपर्यंतच्या रस्ता विस्तारीकरणाचे कार्य पूर्ण झाले आहे. मात्र शितलामाता मंदिर ते खांबतलाव चौकापर्यंतचा रस्ता बांधकामाला अजूनही सुरुवात झाली नाही. त्यातच खांबतलाव चौक ते शास्त्रीनगर चौकापर्यंतच्या रस्त्याची डागडुजी करण्याच्या कामाला प्रांरभ करण्यात आला आहे.या रस्त्यावर लहान मोठे असंख्य खड्डे आहेत. भंडाराहून तुमसरला जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग होत असतो. विशेष म्हणजे आंतरराज्य मार्गावरील वाहतूकही याच रस्त्याने होत असते.परिणामी या रस्त्याचे नुतनीकरणासह विस्तारीकरण होणे अत्यंत गरजेचे असतांना त्यावर फक्त डागडुजी केली जात आहे.डागडुजीत लाखोंची उलाढालसार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरवर्षी अनेक रस्त्यांची डागडुजी केली जाते. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही उपलब्ध करुन दिला जातो. नविन रस्ता डांबरीकरणाचा करायला निधी मोठ्या प्रमाणात लागतो. मात्र डागडुजीत निधी अधिक दाखवून साहित्य मात्र कमी लागत असते. परिणामी रस्त्याच्या डागडुजीत कंत्राटदाराला चांगलाच फायदा होतो. परिणामी रस्त्याचे नविन बांधकामाचे टेंडर मिळविण्यापेक्षा डागडुजीचे काम करण्यात अनेकजण रस दाखवितात. परंतु ज्या रस्त्याचे नुतनीकरण आवश्यक असतांनाही त्यावर डांबराचा लेप लावून रहदारीसाठी रस्ता मोकळा केला जातो. मात्र अल्पावधीतच डांबर उखडून पुन्हा खड्डेमय मार्गाने प्रवाशांना रहदारी करावी लागत असते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक