शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

३०० शेतकऱ्यांचा रस्ता बंद

By admin | Updated: July 27, 2014 23:35 IST

तालुक्यातील स्टेशनटोली (देव्हाडी) पांदण रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने ३०० शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला आहे. परिणामी ऐन हंगामात शेतकऱ्यांची गोची झाली आहे. तर दुसरीकडे होणाऱ्या नुकसानीला

पुलावर चढले पाणी : स्टेशनटोली शिवारातील प्रकारतुमसर : तालुक्यातील स्टेशनटोली (देव्हाडी) पांदण रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने ३०० शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला आहे. परिणामी ऐन हंगामात शेतकऱ्यांची गोची झाली आहे. तर दुसरीकडे होणाऱ्या नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. स्टेशनटोली शिवारातील पांदण रस्त्यावर असलेल्या पुलावर चार फूट पाणी वाहत आहे. मागील आठवड्यात वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांना पूर आला होता. यात नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत होते. स्टेशनटोली पांदण रस्त्यावर असलेल्या नाल्याच्या पुलावर पाणी चढले होते. जवळपास ३ ते ४ फूट पाणी पुलावरून वाहत असल्याने संपूर्ण रहदारी ठप्प झाली होती. परिणामी शेतकऱ्यांना शेतशिवारात जाण्यासाठी रस्ता उरला नाही.तुमसर - गोंदिया राज्य मार्गालगत स्टेशनटोली ग्रामपंचायत अंतर्गत देव्हाडी शिवारात जाण्याकरिता शेतकऱ्यांसाठी पांदन रस्ता आहे. या पांदन रस्त्यावर मोठा नाला आहे. नाल्यावर जुन्या पद्धतीने बांधलेला पुल आहे. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने मुसळधार पाऊस बरसल्यास पुलावर पाणी चढते. परिणामी शेतकऱ्यांचा शेतशिवाराशी संपर्क तुटतो. पाण्याचा वेग जास्त असल्याने सामोर जाता येत नाही. स्टेशनटोली (देव्हाडी) परिसरातील जवळपास ३०० शेतकरी या पांदण रस्त्यावरील पुलाचा वापर रहदारीसाठी करतात. हा पांदन रस्ता मुरुमाचा तयार करण्यात आला आहे. नाल्यापलिकडे रेल्वेचे रुळ आहे.शिवणी गावाकडूनही शेतीवर जाता येत नाही. त्या बाजूने रस्ता नसल्याने शेतकरी चहुबाजूने अडला जातो. ऐन पावसाळ्यात शेतावर साहित्य घेऊन शेतकऱ्यांना जावे लागते. मात्र पांदण रस्त्याशिवाय येथे पर्यायी रस्ता नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. या रस्त्यावर दोन मोठे सिमेंटचे पाईप घालून पूल तयार करण्यात आला आहे. सिमेंटचे पाईप टाकल्यामुळे या पुलाची उंची वाढू शकली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुलावर पाणी चढते. पुलाची उंची वाढविण्याची गरज असताना संबंधित विभागाने याकडे लक्ष दिले नाही. हा पुल सध्या शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी ठरत आहे. संबंधित प्रशासनाचे नियोजनाचा फटका नाहक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)