मधमाश्यांच्या हल्ल्यात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:33+5:302021-02-05T08:40:33+5:30

लाखनी (भंडारा) : मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथे बुधवारी सकाळी ...

Retired teacher killed in bee attack | मधमाश्यांच्या हल्ल्यात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

मधमाश्यांच्या हल्ल्यात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

लाखनी (भंडारा) : मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथे बुधवारी सकाळी घडली. शेतात जात असताना मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. भीमराव राजाराम बोरकर (६०, रा. साकोली) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

भीमराव हे साकोली येथील निवासस्थानाहून बुधवारी सकाळीच ८ वाजेच्या सुमारास रेंगेपार येथे आले. शेतातील नादुरुस्त बोरवेलचे काम पाहण्यासाठी दुचाकीने शेताकडे गेले. त्याच दरम्यान शेतशिवारातील आंब्याच्या झाडावर असलेल्या मधमाश्यांच्या पोळाला काही पक्ष्यांनी डिचल्यामुळे मधमाशा उठल्या. शेताकडे जाणाऱ्या भीमराव बोरकर यांच्यावर त्यांनी अचानक हल्ला केला. यात बोरकर गंभीर जखमी झाले. त्यांना मनोहर बोरकर, चंदू बोरकर यांनी तातडीने लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी त्यांना भंडारा येथे हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा आप्त परिवार आहे.

Web Title: Retired teacher killed in bee attack