शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शिकाऊ परवान्याची मुदत संपणाऱ्यांना दिलासा

By admin | Updated: August 9, 2015 00:49 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू...

थेट चाचणी : परिवहन आयुक्तांचे निर्देशभंडारा : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी व उमेदवारांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली ‘आॅनलाईन अपार्इंटमेन्ट’ योजना गैरसोयीची ठरत असल्याची राज्यभरात ओरड होत असताना नवे परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी यावर उपायही शोधून उमेदवारांना दिलासा दिला आहे. त्यांनी शिकाऊ वाहन परवान्याची (लर्निंग लायसन्स) मुदत संपण्याच्या तारखेनंतर अपॉईन्टमेंट मिळणाऱ्या उमेदवाराची विना अपॉईन्टमेंट चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहे. या संदभार्तील पत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) प्राप्त झाले आहे. आरटीओमध्ये वाहन परवाना काढण्यासाठी होत असलेली उमेदवारांची गर्दी, तासनतास रांगेत उभे राहण्याची येत असलेली पाळी, त्यामुळे वाया जात असलेला वेळ आणि श्रम, या सर्व व्यापातून मुक्त होण्यासाठी परिवहन विभागाने आॅनलाईन अपार्इंटमेन्ट योजना सुरू केली. १७ सप्टेंबर २०१४ पासून शिकाऊ परवान्यासाठी तर १ डिसेंबर २०१४ पासून कायम परवान्यासाठी या योजनेची सक्ती केली आहे. सद्यस्थितीत आरटीओ कार्यालयात कायम वाहन परवान्यासाठी एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अपार्इंटमेन्ट मिळत आहे. पूर्वी याचा फटका शिकाऊ परवान्याची मुदत संपायला आलेल्या अनेक उमेदवारांना बसत होता. यावर उपाय म्हणून परिवहन विभागाने आरटीओ कार्यालयांना दर दिवशीच्या परवान्यांची संख्या वाढवून देण्याचे निर्देश दिले होते, तरीही ओरड सुरू होती. अखेर नवे परिवहन आयुक्तांनी यात लक्ष घालून मार्ग काढला. (जिल्हा प्रतिनिधी)ज्या उमेदवारांनी कायम परवाना चाचणीकरिता अपार्इंटमेन्ट घेतली आहे, परंतु त्यांना शिकाऊ परवान्याच्या मुदतीच्या तारखेनंतरची अपार्इंटमेन्ट मिळालेली आहे, अशा उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून शिकावू अनुज्ञप्तीच्या समाप्तीच्या शेवटच्या आठवड्यात या उमेदवरांची विना अपार्इंटमेन्ट कायम परवान्याची चाचणी घेण्याचे निर्देश दिले. मात्र, अशा उमेदवारांना चाचणीला येतेवेळी त्यांना मुदतीनंतरची अपार्इंटमेन्ट मिळाल्याबाबतचा पुरावा सोबत घेऊन येणे आवश्यक असल्याची अट घातली आहे. शेवटी अपार्इंटमेन्ट घेणाऱ्यांना सुविधा नाहीशिकाऊ परवान्याची मुदत संपण्याच्या शेवटच्या महिन्यात ज्या उमेदवारांनी अपॉईन्टमेंट घेतलेली असेल व त्यांना मुदतीनंतरची अपॉईन्टमेंट मिळालेली असेल, त्या उमेदवाराना ही सुविधा लागू होणार नाही, असेही आयुक्तांनी पत्रात नमूद केले आहे.