अतिक्रमण धारकांचे एसडीओंना निवेदन

By Admin | Updated: February 23, 2016 00:25 IST2016-02-23T00:25:21+5:302016-02-23T00:25:21+5:30

शहरातील अतिक्रमण धारकांना शासनाचे तात्काळ पट्टे देण्यात यावे यासाठी डॉ. अजय तुसमरे यांच्या नेतृत्वात होमगार्ड परेड ग्राऊंड साकोली...

Request for encroachment holders SDO | अतिक्रमण धारकांचे एसडीओंना निवेदन

अतिक्रमण धारकांचे एसडीओंना निवेदन

साकोली : शहरातील अतिक्रमण धारकांना शासनाचे तात्काळ पट्टे देण्यात यावे यासाठी डॉ. अजय तुसमरे यांच्या नेतृत्वात होमगार्ड परेड ग्राऊंड साकोली येथे अतिक्रमण धारकांचे स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात आला व शेवटी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
साकोली येथे बऱ्याच वर्षापासून हजारो लोक घरे बांधून राहत आहेत. सदर लोक नगरपंचायतला कर देत असले तरी शासनाने त्यांना पट्टे दिले नाही. परिणामी पट्ट्याअभावी नागरिकांना शासकिय योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या गरजू लोकांना शासनाने त्वरित पट्टे वितरित करण्यात यावे. यासाठी डॉ. अजय तुमसर यांनी अतीक्रमण धारकांची नोदंणी करुन तसे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले.
यावेळी डॉ. अजय तुमसरे, राजु कोडे, विष्णु रणदिवे, नरेश करंजेकर, रतन झिंगरे, दिनेश खोटेले, उमेश भुरे, प्रकाश करजेकर, आशीक गणवीर, विजय दुबे, विनायक देशमुख, ओम गायकवाड, जितेंद्र मेश्राम, मोहन चांदेवार, चंद्रशेखर चोले, राहुल बडवाईक, ज्ञानेश्वर रहांगडाले, रामेश्वर निंबेकर, अविनाश खोटेले, ज्ञानेश्वर कापगते, भुपेश पंधरे, रवि चांदेवार, आशिष कासमानी, रवि चांदेवार व मनोज भैसारे उपस्थित होते. प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Request for encroachment holders SDO