शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या हजेरीने दिलासा

By admin | Updated: October 6, 2014 23:06 IST

महिनाभरापासून पाठ फिरविलेल्या पावसामुळे बळीराजा मोठ्या बिकट संकटात सापडला होता. शेतातील धानपिके पाण्याअभावी करपू लागली होती, तर उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते.

अखेर परतीचा मान्सून बरसला : नागरिकांची उकाड्यातून सुटकांभंडारा : महिनाभरापासून पाठ फिरविलेल्या पावसामुळे बळीराजा मोठ्या बिकट संकटात सापडला होता. शेतातील धानपिके पाण्याअभावी करपू लागली होती, तर उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते. सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानकपणे जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने सर्वांसाठी आल्हाददायक ठरले आहे. पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असताना यावर्षी पावसाची काही दिवसांचा अपवाद वगळता क्वचितप्रसंगी पाऊसाने हजेरी लावली होती. सुरूवातीला शेतकऱ्यांसमोर मोठे अस्मानी संकट ओढवल्यानंतर त्यांनी कसेबसे धानाची रोवणी आटोपली. त्यानंतर काही दिवसासाठी पावसाने जणू रजा घेतल्याची परिस्थिती होती. 'कधी ऊन्ह कधी पाऊस' अशा अस्मानी परिस्थितीत बळीराजाच्या चेहऱ्यावर मोठ्या आर्थिक विवंचनेचा प्रश्न आवासून दिसून येत होता. दुबारनंतर तिबार पेरणीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अशाही परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांची पऱ्हे करपले तर काहींनी असलेल्या साधन सामुग्रीवरून ते जगवून रोवणी आटोपली. मागील महिनाभरापासून पावसाने अक्षरश: दडी मारली होती. धानपिके गर्भावस्थेत असताना धानाला शेवटच्या एका पाण्याची नितांत गरज आहे. मात्र उपलब्ध सिंचन व्यवस्था विद्युत विभागाच्या भारनियमनामुळे कुचकामी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संकट उभे ठाकले होते. ज्यांच्याकडे साधन उपलब्ध होते त्यांनी सिंचन करून धानाला जगविले. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांची यात फजिती झाली. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे पिके पाण्याअभावी करपू लागल्याने त्यांनी देवाकडे पाण्यासाठी साकळे घालणे सुरू केले होते. दरम्यान, हिवाळ्याच्या तोंडावर सध्या उकाडा वाढल्याने जणू उन्हाळाच लागल्याची प्रचिती मागील काही दिवसांपासून येत होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी पाण्यासाठी देवाला साकळे घालून आर्जव करीत असल्याचे दिसून येते होते. आज सकाळपासून निरभ्र वातावरण होते. मात्र दुपारी ३ च्या सुमारास अचानकपणे आभाळ ढगांनी दाटून आले. मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरूवात झाली. अर्ध्या तासात २५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. अचानकपणे कोसळलेल्या या पावसामुळे वातावरणातील उकाडा आल्हाददायक स्थितीत परिवर्तीत झाला. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला. बऱ्यापैकी झालेल्या या पावसाने शेतातील करपू लागली धानपिके काही प्रमाणात का होईना वाचण्याची शक्यता बळावली आहे. (शहर प्रतिनिधी)