शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित गावठानाच्या शेतमालकांना मिळणार पुनर्वसन पॅकेजचा लाभ

By admin | Updated: July 9, 2014 23:16 IST

गोसीखुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रातील ८५ प्रकल्पग्रस्त गावांचे ज्या ६४ गावठानात पुनर्वसन होत आहे. त्या गावठानाच्या शेती मालकांना १२०० कोटी रूपयाच्या पुनर्वसन पॅकेजचा लाभ देण्याचे आश्वासन

गोसे (बुज.) : गोसीखुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रातील ८५ प्रकल्पग्रस्त गावांचे ज्या ६४ गावठानात पुनर्वसन होत आहे. त्या गावठानाच्या शेती मालकांना १२०० कोटी रूपयाच्या पुनर्वसन पॅकेजचा लाभ देण्याचे आश्वासन पुनर्वसन उपआयुक्तांनी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
गोसीखुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रातील भंडारा जिल्ह्यातील ३४ व नागपूर जिल्ह्यातील ५१ अशा एकूण ८५ गावांचे पुनर्वसन केले जात आहे. या ८५ गावांचे ६४ नवीन गावठानात पुनर्वसन होत आहे. या पुनर्वसनाच्या कामाकरीता मोठ्या प्रमाणातील शेती नवीन गावठानासाठी सरकारने भुसंपादीत केली आहे. हे पुनर्वसनाचे काम धरणाचा एक भाग आहे. या गावठान शेत मालकांना मोबदल्याशिवाय काहीही मिळाले नाही. त्यामुळे हे शेतकरी १२०० कोटी रूपयाच्या पुनर्वसन पॅकेजचा लाभ त्यांना देण्याची मागणी करीत होते.
विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वात नागपूर येथे अनेक गावातील गावठानातील शेतकऱ्यांसह शिष्टमंडळाने नागपूर विभागाचे पुनर्वसन उपआयुक्त संजय गौतम, विशेष पुनर्वसन कक्ष प्रमुख उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके यांना भेटून गावठान शेतकऱ्यांना ही १२०० कोटी रूपयाच्या पुनर्वसन पॅकेजचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांनाही पुनर्वसन पॅकेजचा लाभ देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी विलास भोंगाडे, अंबिर दाबडडुबके, नामदेव तितीरमारे, शैलेश चाफले, गिता निमगडे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (वार्ताहर)