शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ऐनवेळी धान खरेदीला नकार; साडेतीन हजार पोती उघड्यावर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST

गोंडसावरीतील प्रकार : शेतकऱ्यांचा वाली कोण? लाखनी : खरीप हंगामातील धानाची अद्याप उचल करण्यात न आल्याने गोंडसावरीतील शेतकऱ्यांसमोर मोठे ...

गोंडसावरीतील प्रकार : शेतकऱ्यांचा वाली कोण?

लाखनी : खरीप हंगामातील धानाची अद्याप उचल करण्यात न आल्याने गोंडसावरीतील शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. ऐनवेळी तालुका खरेदी-विक्री संघाने धान मोजणीस असमर्थता दाखवल्याने तब्बल साडेतीन हजार पोती धान सडण्याच्या मार्गावर आहे.

शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान खरेदी करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी पणन महासंघाद्वारे धान खरेदी केली जाते. मात्र डिसेंबर महिन्यात टोकन देऊनही गोंडसावरीतील शेतकऱ्यांच्या धानाची अद्याप उचल करण्यात आलेली नाही. स्थानिक गुदामाची क्षमता तोकडी असल्याने एक दिवसाच्या खरेदीतच ते फुल्ल झाले. आता गावकऱ्यांनीच गुदाम उपलब्ध करून द्यावे, त्यानंतरच आम्ही धान खरेदी करू अशी आडमुठी भूमिका तालुका खरेदी-विक्री संघाने घेतली आहे. येथील शेतकऱ्यांना आजपर्यंत धान खरेदीचे आश्वासन देण्यात आले, मात्र ऐनवेळी ४० किमी दूर असलेल्या एका केंद्रावर खरेदी करू शकतो, असे सांगण्यात आले.

सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे परवडण्यासारखे नाही.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा पणन कार्यालयाचे उंबरठे शिजवले, मात्र कोणत्याही अधिकाऱ्याने दाद दिली नाही. त्यामुळे आता या ग्रामस्थांना न्याय देणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

...तर आंदोलन करणार

गोंडसावरीत नव्वद टक्के अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेती आणि मोलमजुरी करून ते आपल्या संसाराचा गाडा हाकतात. अशात शेतात राबून पिकवलेले सोन्यासारखे धान अद्याप सरकारने खरेदी न केल्याने गावकऱ्यांमध्ये संताप आहे. लवकरात लवकर यावर तोडगा न निघाल्यास सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढावा

धान खरेदीसाठी सरकारी कार्यालयांचे खेटे घालून गावकरी थकले आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच या प्रकरणात मध्यस्थी करून लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी सर्वांची भावना आहे.

बॉक्स

असे आहेत पर्याय

गोंडसावरीतील गुदाम तातडीने रिकामे करून गावकऱ्यांच्या धानाची मोजणी करावी. गावातच असलेल्या ग्रामपंचायतीच्या सभागृहात धान खरेदी करण्यात यावी. सभागृह बांधकामाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा वापरण्याची परवानगी द्यावी किंवा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात याची व्यवस्था करावी. खरेदी-विक्री संघाने सालेभाटा येथे अतिरिक्त गुदाम भाड्याने घेऊन धानाची मोजणी करावी, असे पर्याय उपलब्ध आहेत.