शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराने ठोकला घरात रात्रभर मुक्काम

By admin | Updated: April 25, 2017 00:18 IST

जंगलालगत गाव म्हटले की, हिंस्त्र श्वापद व मानवांचा संघर्ष नेहमीचा विषय आहे.

कोका येथील घटना : रात्री २.३० वाजता पळवून लावण्यात वनविभागाला आले यश, जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरुभंडारा : जंगलालगत गाव म्हटले की, हिंस्त्र श्वापद व मानवांचा संघर्ष नेहमीचा विषय आहे. या श्वापदांच्या हल्ल्यात शेकडो ग्रामस्थ जखमी झाल्याची नोंद शासकीय दफतरी आहे. कोका येथे असाच प्रकार रविवारी रात्रीला घडला. जंगली डूकराने ग्रामस्थाला जखमी करुन एका घरामध्ये बसस्थान मांडले. हा थरारक प्रकार मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत चालला. या प्रकाराने वनकर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली. मधुकर गोमा हातझाडे (६३) असे जखमीचे नाव आहे. कोका हे गाव जंगलाच्या सानिध्यात वसले आहे. या दरम्यान वाघ, बिबट यांच्यासह हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. अनेकदा हे प्राणी कोका गावात येतात. रविवारला दिवसभर शेतात राबल्यानंतर मधुकर हातझाडे हे सायंकाळी घरी आले. यानंतर ते घरातील अंगणात बसले असतांना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जंगलातून सुसाट वेगात आलेले एक डुक्कराने थेट मधुकर यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या डुकराच्या हल्ल्याने मधुकर हे भयभीत झाले व जिवाच्या आकांताने वाचविण्यासाठी किंकाळी फोडली. ग्रामस्थ त्याच्या मदतीला धावून येईपर्यंत मधुकर हे रक्तबंबाड झाले होते. ग्रामस्थांच्या ओरडण्याने भांबावलेले डुक्कर लगतच्या सुधाकर हातझाडे यांच्या घरात शिरले. क्षणाचा विलंब न लावता. सुधाकर यांनी घराच्या दाराची कडी बाहेरुन लावली व डुकराला घरात कोंडले. दरम्यान कोका वन कार्यालयात उपस्थित क्षेत्र सहायक डब्ल्यू आर. खान, वनरक्षक विपीन डोंगरे, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाल्मीक गोबाडे यांनी जखमी मधुकर यांना वनविभागाच्या वाहनाने तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. दरम्यान गावात रानडुकराने मधुकर हातझाडे यांना जखमी करुन सुधाकर हातझाडे यांच्या घरात शिरल्याची माहिती ऐव्हानात गावात पसरली. यामुळे ग्रामस्थांनी हातझाडे यांच्या घरासमोर एकच गर्दी झाली. सदर घटनेची माहिती क्षेत्र सहायक डब्ल्यू. आर. खान यांनी उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांना दिली. त्यांच्या निर्देशानुसार सहायक वनसंरक्षक राजेंद्र चोपकर, वनजीव विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे, वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी यांनी कोका गाठले. यानंतर सदर वन कर्मचाऱ्यांनी घरात कोंडलेल्या रानडुकराला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. हा प्रकार मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत चालला. यानंतर ग्रामस्थांना शांत करुन एका बाजुला उभे राहण्याचे सांगुन मोठ्या शिताफीने घराचे दार उघडले. यानंतर डुकराने पळ काढला. तो जंगलात गेल्याने ग्रामस्थांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. (शहर प्रतिनिधी)वन कर्मचाऱ्यांनी रात्र काढली जागूनकोका येथे घडलेल्या या प्रकारानंतर ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण होते. जंगली डूक्कर जंगलात सुरक्षीत स्थळी गेला. मात्र, तो परत येवू नये याकरिता वनकर्मचाऱ्यांनी कोका येथे रात्र जागून काढली. सायंकाळी ७ वाजेपासून तर पहाटे ६ वाजेपर्यंत डूकराकरिता वन कर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली. सकाळी ६ नंतर सर्व वन कर्मचारी कर्तव्यावर घरी पोहचले. या छोट्याशा घटनेवरुन वन कर्मचाऱ्यांचे कर्तव्य लक्षात येते.डूकराच्या हल्ल्यात जखमी झालेले मधुकर हातझाडे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी मदत करु.डब्ल्यू. आर. खानक्षेत्र सहायक, कोका