शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदुरात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: October 19, 2016 00:41 IST

पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे, वीज बिल माफ करण्यात यावे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे, ..

तहसीलदारांना निवेदन : पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ -रमेश डोंगरे यांचा आरोपलाखांदूर : पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे, वीज बिल माफ करण्यात यावे, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे, विद्यार्थ्याच्या शुल्कामध्ये सवलत मिळाली पाहिजे, विदर्भ राज्य वेगळे झाले पाहिजे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर तारेचे कुंपण मिळाले पाहिजे, आधारभूत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, अशा विविध मागण्यांसाठी लाखांदूर तालुका काँग्रेसच्यावतीने मंगळवारला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.येथील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून लाखांदूर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तहसील कार्यालय परिसरात सभा घेण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या प्रदेश सचिव प्रमिला कुटे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, भंडाऱ्याचे माजी नगराध्यक्ष बशिर पटेल, नगरसेवक रामचंद्र राऊत, शफी लद्धानी, भुमेश्वर महावाडे, मनोहर राऊत, डॉ.अजय तुमसर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप बुराडे, मंगला बागमारे, प्रणाली ठाकरे, शुध्दमता नंदागवळी, नीलिमा टेंभुर्णे, ताराचंद मातेरे, धम्मदीप रंगारी, गोपाळ मेंढे, धनु कार, भोजराव राऊत, गजानन नाकतोडे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य म्हणाले, नैसर्गिक आपत्तीना नेहमी तोंड देणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. अशाही परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाने पीक कर्जातून पीक विम्याची रक्कम कपात केल्यामुळे शेतकरी उघड्यावर पडला आहे. पिकाची नासाडी होऊनही पीक विम्याचा लाभ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट ओढवले आहे. असे असताना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी शासनाकडून टाळाटाळ का होत आहे, असा प्रश्नही डोंगरे यांनी उपस्थित केला. यावेळी प्रमिला कुटे म्हणाल्या शेतकरी शेतीमध्ये नुकसान सहन करीत आहे, त्यामुळे सत्ताधारी भाजपने दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर म्हणाले, आदिवासींचे वनहक्काचे दावे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पडून आहेत. अशीच स्थिती राहिली तर त्यांना न्याय कसे मिळेल, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रूपये नुकसानभरपाई द्यावी, थकीत वीज जोडणी करून २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)