शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राजाभोज कॉलनीला समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

गोंदिया : शहरातील भगतसिंह वॉर्डातील राजाभोज कॉलनीत रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, विद्युत ट्रान्सफाॅर्मर अशा विविध समस्यांनी विळखा घातला ...

गोंदिया : शहरातील भगतसिंह वॉर्डातील राजाभोज कॉलनीत रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, विद्युत ट्रान्सफाॅर्मर अशा विविध समस्यांनी विळखा घातला आहे. या समस्या सोडविण्यासाठी अनेकदा लोकप्रतिनिधींना निवेदन दिले. मात्र, अद्याप त्यांनी या समस्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कॉलनीवासीयांनी समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्याकडे धाव घेतली असून, त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्वरित या समस्या मार्गी न लागल्यास आंदोलन करणार, असा इशाराही कॉलनीवासीयांनी दिला आहे.

राजाभोज कॉलनीत सुमारे ३००-४०० घरे असून १०० च्यावर नवीन घरांचे बांधकाम सुरू आहे. एवढ्या मोठ्या कॉलनीत विद्युत विभागाचा एकच ट्रान्सफाॅर्मर आहे. परिणामी, विद्युत दाब कमी होण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

भर उन्हाळ्यात कूलर, पंखे व घरगुती बोअरवेलचा पंप काम करत नाही. त्यामुळे पाण्याची समस्या उद्भवली आहे. गोंदिया-तिरोडा मुख्य मार्गावरून राजाभोज कॉलनीत जाण्याकरिता एकच मार्ग असून, त्यावर मोठाले खड्डे पडल्याने नागरिकांना ये-जा करण्यास कसरत करावी लागत आहे. शिवाय कॉलनीतील अन्य रस्त्यांची समस्या यापासून वेगळी नसून, नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात यावे. कॉलनीत नाल्या नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच कॉलनी बाहेर ये-जा करण्यासाठी एकमेव अरुंद पूल असून तो जीर्ण झाला आहे.

या पुलावरून ये-जा करणे धोक्याचे झाले असून या पुलाचे त्वरित नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन कॉलनीवासीयांनी आमदार, नगरसेवक, नगराध्यक्ष व संबंधित विभागाला वारंवार दिले. मात्र, त्यांच्या समस्यांची दखल अद्याप घेण्यात आली नाही. अशात कॉलनीवासीयांनी रविवारी (दि. ६) नगराध्यक्ष अशोक इंगळे यांना निवेदन देऊन कॉलनीतील समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात, अशी मागणी केली. निवेदन देताना लोकचंद बिसेन, अशोक टयीकर, गणेश बिसेन, महेंद्र ठाकरे, प्रवीण मुजारिया, दिनेश रहांगडाले, राजीव ठकरेले, तिरथ तिलगाम, अमित मंडल, रोशन भानारकर आदी उपस्थित होते.