शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

सडक अर्जुनी : पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्यावतीने ...

सडक अर्जुनी : पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्यावतीने खा. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे करण्यात आली. यासंदर्भातील निवेदनसुध्दा त्यांना रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता देण्यात आले.

यावेळी आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार उपस्थित होते. पोलीस पाटील हे पद मानधन तत्त्वावर मानसेवी पद म्हणून कार्यरत आहे. आपातकालीन व नैसर्गिक परिस्थितीत शासनास सहकार्य करीत असते. पोलीस पाटील हे पद मानधन तत्त्वावरील असल्यामुळे अंगणवाडी सेविकाप्रमाणे त्यांना वयाची अट लागू होत नाही.

सध्या कोरोना संक्रमणाची परिस्थिती पाहता पोलीस पाटील पदाला मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून या पदावर कार्यरत असलेल्या पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ करण्यात यावे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्व पोलीस पाटलांच्या वारसांची नियुक्ती त्यांच्या रिक्त जागी करण्यात यावी व सर्व सेवानिवृत्त पोलीस पाटलांना सेवानिवृत्तीची योजना लागू करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली.

यासंदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन खा. प्रफुल्ल पटेल यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात पोलीस पाटील संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, जिल्हा अध्यक्ष दिलीप मेश्राम, श्रीराम झिंगरे, नंदा ठाकरे, उमेश वाढई, बोरकर पाटील यांचा समावेश होता.

४० टक्के पोलीस पाटलांची पदे रिक्त

वर्ष २०२० पासून कोरोना संकटाचा सामना करीत असताना मदत कार्यामुळे आजपर्यंत ४३ पोलीस पाटील मृत्युमुखी पडले आहेत. मागील ४ वर्षांपासून नवीन पोलीस पाटील पदे भरण्यात आलेली नाहीत व अजून दोन वर्षे रिक्त जागा भरण्याची शक्यता नाही. त्यामुळे राज्यात ४० टक्के पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका पोलीस पाटलाला अनेक गावांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे.