शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

बरसल्या मृगधारा, मशागतीला जाेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

मान्सूनची हाेत असलेली आगे-पिछेहाट यामुळे ताे केव्हा बरसेल याची शाश्वती नव्हती. एरवी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पाऊस बरसताे. मात्र बुधवारपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला असतानाही पाऊस बरसला नाही. खरीपाच्या तयारीसाठी चातकासारखी वाट बघत असलेला शेतकरी चिंतातूर हाेता. मात्र गुरुवारी मृगधारा बसरल्या आणि बळीराजाची चिंता थाेडीफार दूर झाली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राेहणी नक्षत्रात पावसाच्या हलक्या सरी बसरल्यानंतर मृग नक्षत्राचा पहिला दिवस काेरडा गेला. मात्र गुरुवारी मृगधारा लाखांदूर तालुका वगळता सर्वदूर बसरल्या. सायंकाळी ४ वाजताच्यानंतर दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने मशागतीच्या कामाला जाेर येणार असून नागरिकांना मात्र थाेडा वेळासाठी उकाड्यापासून दिलासा मिळाला.मान्सूनची हाेत असलेली आगे-पिछेहाट यामुळे ताे केव्हा बरसेल याची शाश्वती नव्हती. एरवी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पाऊस बरसताे. मात्र बुधवारपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला असतानाही पाऊस बरसला नाही. खरीपाच्या तयारीसाठी चातकासारखी वाट बघत असलेला शेतकरी चिंतातूर हाेता. मात्र गुरुवारी मृगधारा बसरल्या आणि बळीराजाची चिंता थाेडीफार दूर झाली. तर दुसरीकडे रबी हंगामांतर्गत शेतशिवारातून चुरणा करुन धान खरेदी केंद्रावर नेणारे धान ओले झाले. भंडारा, माेहाडी, तुमसर, लाखनी, साकाेली व पवनी तालुक्यात पाऊस बरसल्याची नाेंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या पावसामुळे धानाची पाेती ओली झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामाेरे जावे लागणार आहे. गुरुवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण हाेते. मात्र वातावरणात बदल घडवित वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील सहाही तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान मृग नक्षत्रात पाऊस बरसेल या आशेपाेटी पेरणीपुर्व मशागतीच्या कामाला प्रारंभ केला आहे. नांगरणीच्या कामाला जाेर आल्याचेही दिसून येते. धानाची खरेदी हाेवून हाती आलेल्या पैशातूनच बळीराजा खरीपाच्या तयारीला जुंपत असताे.

शेतकरी मात्र संभ्रमात- धान खरेदीची मर्यादा किती याबाबत अजूनही संभ्रमता कायम आहे. गुरुवारी बरसलेल्या पावसानंतर बहुतांश धान ओले झाले आहे. धान पाखर झाले म्हणून ओले झालेले धान घेण्यास खरेदी केंद्रावर मज्जाव केला जाताे. याचाही फटका शेतकऱ्यांनाच सहन करावा लागताे. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती