शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने शेवटच्या चरणात गाठली सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसानंतर शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आली हाेती. पावसाने दडी मारल्याने राेवण्या रखडल्या हाेत्या. मध्यंतरी हलक्या सरी बरसत हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी केली. मात्र, बहुतांश राेवणी रखडली हाेती. दरम्यान झालेल्या पावसाने राेवणी पूर्ण झाली; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. यंदाही या लहरीपणाचा फटका बसला. हवा तेव्हा पाऊस बरसला नाही आणि आता शेवटच्या चरणात धाे-धाे बरसत आहे. गत पंधरा दिवसांत २१५ मिमी पाऊस काेसळला असून आतापर्यंत जिल्ह्यात ११३५.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. या पावसाने जवळजवळ सरासरी गाठली असली तरी हलक्या धानाला मात्र फटका बसत आहे.भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधी १२४१ मिमी पाऊस अपेक्षित असताे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ११३५.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. हा पाऊस विद्यमान सरासरीच्या ९१ टक्के आहे. विशेष म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के सरासरी पावसाची नाेंद झाली हाेती. मात्र, शेवटच्या चरणात जाेरदार पाऊस बरसला. त्यामुळे सरासरी वाढली आणि प्रकल्पही तुडुंब भरले आहेत.जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसानंतर शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आली हाेती. पावसाने दडी मारल्याने राेवण्या रखडल्या हाेत्या. मध्यंतरी हलक्या सरी बरसत हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी केली. मात्र, बहुतांश राेवणी रखडली हाेती. दरम्यान झालेल्या पावसाने राेवणी पूर्ण झाली; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला. १० सप्टेंबरनंतर पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. मात्र, या पावसाचा फटका हलक्या धानाला बसला. लाेंब्या आलेला धान जमिनीवर झाेपला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. गत आठवड्यात तर माेहाडी आणि तुमसर तालुक्यात अतिवृष्टी झाली. या शेवटच्या चरणातील पावसाने सरासरी गाठली. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. धान काढणीला आला असताना पाऊस काेसळत असल्याने नुकसान हाेण्याची माेठी भीती आहे.

सर्वाधिक पावसाची नाेंद माेहाडी तालुक्यात- जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस माेहाडी तालुक्यात १४४३.८ मिमी काेसळला आहे. हा विद्यमान सरासरीच्या १२२ टक्के आहे. त्या खालाेखाल साकाेली तालुक्यात १२२०.९, लाखनी ११९३.३, लाखांदूर ११०५.६, तुमसर ९७६.६ आणि भंडारा तालुक्यात ९६७.३ मिमी पाऊस काेसळला.  २१ सप्टेंबर राेजी तर माेहाडी तालुक्यावर आभाळच फाटले हाेते. अवघ्या २४ तासांत १४०.५ मिमी पावसाची नाेंद झाली.  इतर तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाला आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस