मोहाडी तालुक्यात चार लाख ८७ हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:01:13+5:30

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात दिलेल्या धानाची रक्कम मिळालेली असून बोनसची मात्र आजही शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. अवकाळी पावसाने गहू जिरी (बारीक) झाल्याने उत्पादन कमी झाले आहे.

Purchase of 4 lakh 87 thousand quintals of paddy in Mohadi taluka | मोहाडी तालुक्यात चार लाख ८७ हजार क्विंटल धान खरेदी

मोहाडी तालुक्यात चार लाख ८७ हजार क्विंटल धान खरेदी

ठळक मुद्देखरीप हंगामासाठी शेतकरी चिंतेत : बोनसच्या मागणीला जोर

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर अ ग्रेडचे एक लक्ष ३५ हजार ५४.२० क्विंटल धान खरेदी करण्यात आले असून ब ग्रेडचे तीन लक्ष ५२ हजार ६५४.८० क्विंटल असे एकूण चार लक्ष ८७ हजार ७०८ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश धान मिलिंग करिता पाठविण्यात आलेला असून काही प्रमाणात धान खरेदी केंद्रावर धान अजूनही पडून आहे.
मोहाडी तालुक्यातील कांद्री धान खरेदी केंद्रावर ४५४३७ क्विंटल, करडी केंद्रावर ३६९३४, काटे बामणी केंद्रावर ४१ हजार २८९, मोहाडी केंद्रावर ८४ हजार ५६३, मोहगाव देवी केंद्रावर २४ हजार ७३, पालोरा केंद्रावर २७ हजार ४९८, रोहना केंद्रावर १ हजार ५५६, चिचोली केंद्रावर ३ हजार ६१, डोंगरगाव केंद्रावर ३१ हजार ९७८, ताडगाव केंद्रावर २२ हजार ५९०, उसर्रा केंद्रावर ३१ हजार २३०, आंधळगाव केंद्रावर २ हजार २४२, तर डोंगरदेव, नेरी, वरठी या केंद्रावर ब ग्रेडचे धान खरेदी करण्यात आलेले नाही, तर अ ग्रेडचे धान चिचोली केंद्रावर ४२ हजार ९३८, डोंगरदेव केंद्रावर ८ हजार ८८०, नेरी केंद्रावर ३३ हजार ७६६, रोहणा केंद्रावर २३ हजार ६७५, वरर्ठी केंद्रावर २५ हजार ७९३ क्विंटल धान खरेदी करण्यात आलेले आहे.
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात दिलेल्या धानाची रक्कम मिळालेली असून बोनसची मात्र आजही शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे.
अवकाळी पावसाने गहू जिरी (बारीक) झाल्याने उत्पादन कमी झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या गव्हाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर वाढलेला आहे.त्यामुळे शेतकरयांमधून बोनसची मागणी होत आहे.

बोनसची प्रतीक्षा मात्र कायम
खरीप हंगामात खरेदी केलेला धानाचा बोनसची अद्यापही अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. शासनाने शेतकऱ्यांना बोनस जाहिर केला असला तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा आहे. कोरोना संकटामुळे अडचणी आलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर लवकरात लवकर बोनस जमा करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Purchase of 4 lakh 87 thousand quintals of paddy in Mohadi taluka

टॅग्स :agricultureशेती