शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर बाजार समितीवर जनहित आघाडीचे वर्चस्व

By admin | Updated: August 23, 2016 01:05 IST

जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या तुमसर - मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती

तुमसर : जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या तुमसर - मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित झाला. यात बळीराजा जनहित आघाडीचे १५ उमेदवार विजयी झाले. शेतकरी आघाडी ४, अपक्ष १ तर स्वाभिमान शेतकरी आघाडीला खाते उघडता आले नाही. भाऊराव तुमसरे व अरविंद कारेमोरे यांच्या नेतृत्वात बळीराजा जनहित आघाडीने बाजी मारली. तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची रविवारला पार पडली. आज सोमवारला सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. सेवा सहकारी गटातून सर्वसाधारण बळीराजा जनहित आघाडीचे भाऊराव तुमसरे ६९८, हरेंद्र रहांगडाले ५४४, सुनिल गिरीपुंजे ५५२, डॉ. अशोक पटले ५१३, महादेव पचघरे ४५९, राजेश पटले ५७५, कुसूम कांबळे (महिला राखीव) ६३७, चंद्रकला ढेंगे ५०९, व्यापारी अडते गटातून अरविंद कारेमोर ३३७, अनिल जिभकाटे ३३६, पणन प्रक्रीया सुभाष बोरकर ४३, ग्राम पंचायत गट हरिधर गोंडाणे ५४४ (अनुसूचित जाती/जमाती), विमुक्त भटक्या जाती-जमाती गणेशराम बावणे ५५८, ग्राम पंचायत दुर्बल गटातून बालकदास ठवकर ४६७, तोलारी/हमाल गटातून चंद्रशेखर सेलोकर १२३ (अपक्ष), शेतकरी आघाडीचे रामदयाल पारधी ५६७, किरण अतरकी ४७७ (सेवा सहकारी गट) रामेश्वर कारेमोरे (ग्रामपंचायत) ५६६ यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात बळीराजा जनहित आघाडीचे सहादेव ढबाले व सतिश चौधरी यांना ५२९ अशी समसमान मते पडली होती. त्यामुळे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पुनरमोजणीची मागणी केली होती. पुनरमोजणीनंतर चौधरी यांना ५२८ तर ढबाले यांना ५२६ मते मिळाल्याने चौधरी यांना विजयी घोषित करण्यात आले. आज झालेल्या मतमोजणीत ५ संचालक पुन्हा निवडून आले. उपसभापती राजकुमार माटे यांचा निसटता पराभव झाला. तब्बल सात वर्षानंतर बाजार समितीची निवडणूक झाली. विद्यमान सभापती भाऊराव तुमसरे यांनी सर्वात जास्त मते घेऊन वर्चस्व प्रस्थापित केले. येथे बळीराजा जनहित आघाडीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. भाऊराव तुमसरे यांची सभापतीपदी पुन्हा विराजमान होण्याची शक्यता आहे. विजयी उमेदवारांनी शहरातून त्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरिहर कुहीकर, सहायक अधिकारी पी. डब्ल्यू. भानारकर, अमित सुर्यवंशी यांनी काम पाहिले. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. (तालुका प्रतिनिधी)