कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास महाराष्ट्र शासनाच्या अपयशाचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:00 AM2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:59+5:30

केंद्र सरकारने सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी आधी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, मात्र महाराष्ट्र शासनाने कोणतीही मदत सर्वसामान्य जनतेला या बिकट परिस्थीतीत केलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी होण्याऐवजी अधिक गडद होत चालले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यभर महाराष्ट्र बचाओ आंदोलन 'माझे आंगण आमचे रणांगण' या मोहिमेअंतर्गत करण्यात आले.

Protested Maharashtra government's failure to prevent the spread of corona | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास महाराष्ट्र शासनाच्या अपयशाचा केला निषेध

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास महाराष्ट्र शासनाच्या अपयशाचा केला निषेध

Next
ठळक मुद्देसाकोलीत भाजपचे आंदोलन : अधिकाऱ्यांना सोपविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : कोरोना संकटकाळात राज्यात समस्या आवासून उभ्या आहेत. मात्र समस्या सोडविण्यास महाराष्ट्र शासन अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला असून त्याचा निषेध करण्यात आला. समस्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
केंद्र सरकारने सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी आधी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, मात्र महाराष्ट्र शासनाने कोणतीही मदत सर्वसामान्य जनतेला या बिकट परिस्थीतीत केलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी होण्याऐवजी अधिक गडद होत चालले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यभर महाराष्ट्र बचाओ आंदोलन 'माझे आंगण आमचे रणांगण' या मोहिमेअंतर्गत करण्यात आले. भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या घरासमोर, चौकात, ग्रामीण भागात बुथस्तरावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मास्क व काळया फिती लावून सरकारच्या निषेधाचे फलक हाती घेवून सकाळी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष लखन बर्वे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता कापगते, जगन उईके, शहर अध्यक्ष किशोर पोगडे, रविंद्र परशुरामकर, धनवंता राऊत, मनिष कापगते, नेपाल रंगारी, शंकर हातझाडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Protested Maharashtra government's failure to prevent the spread of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.