शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सत्यपाल महाराजावरील हल्ल्याचा मअंनिसच्या वतीने निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2017 00:23 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रचारक व समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराजांवर भ्याडपणे हल्ला करून...

निवेदन : आरोपीला अटक करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रचारक व समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराजांवर भ्याडपणे हल्ला करून जखमी केल्यामुळे या घटनेचा निषेध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडाराच्या वतीने करण्यात आला. या घटनेमागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी शासनाने कसून तपास करावा यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.सत्यपाल महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले यांच्या विचाराचा वारसा सांगून जनजागृतीचे मोलाचे कार्य करीत आहेत. समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ठ प्रथा, व्यसनमुक्ती दूर व्हावी यासाठी समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे, डॉ.एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर समाजातील सनातनी वृत्तीच्या लोकांना हैदोस मांडला आहे. समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्यांवर सुनियोजितपणे हल्ले करणे सुरु आहे. यातच सत्यापल महाराजांवर जीवघेणा हल्ला चढवून समाजप्रबोधनाची चळवळ क्षीण करण्याचा प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्रात होत आहे. या घटनेचा निषेध व या घटनेमागील सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, प्रा.नरेश आंबीलकर, हर्षल मेश्राम, कन्हैया नागपुरे, चंद्रशेखर भिवगडे, प्रा.डी.जी. रंगारी, त्रिवेणी वासनिक, बासप्पा फाये आदी कार्यकर्ते उपस्थित होते.