शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

उद्घोषणा नगर परिषदेची निवडणूक नगर पंचायतची

By admin | Updated: October 3, 2015 00:29 IST

साकोलीत नगर पंचायत ऐवजी नगर परिषद व्हावी यासाठी आमदार राजेश काशीवार यांच्या पाठपुराव्यानंतर राज्यपालांनी नगर परिषदेची उद्घोषणा केली.

साकोलीत द्विधा स्थिती : न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षाभंडारा : साकोलीत नगर पंचायत ऐवजी नगर परिषद व्हावी यासाठी आमदार राजेश काशीवार यांच्या पाठपुराव्यानंतर राज्यपालांनी नगर परिषदेची उद्घोषणा केली. असे असताना राज्य निवडणूक आयोगाने नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या निवडणुकीमुळे काहींना दिलासा तर काहींना निवडणूक लढण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान यांनी राज्यातील सर्वच तालुका स्थळावरील ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर प्रत्येक ठिकाणी तहसीलदार यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते. दरम्यान सेंदूरवाफाचा समावेश करुन साकोलीत नगर परिषद व्हावी, यासाठी आमदार राजेश काशीवार यांनी शासन स्तरावर भक्कम पाठपुरावा केला. त्यानंतर राज्यपालांनी साकोलीत नगर परिषदेची उदघोषणा केली. परंतु राज्य निवडणूक आयुक्तांनी ३० सप्टेंबरला राज्यातील १३८ पैकी ६८ नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. त्यात साकोली नगर पंचायत निवडणुकीचाही समावेश आहे. नगर परिषदेची उद्घोषणा झाल्यानंतर त्यात समाविष्ट होणाऱ्या गावातील काही इच्छुकांनी निवडणूक लढण्याची तयारी केली होती, परंतु आता नगर पंचायतीमुळे त्या इच्छुकांना निवडणूक लढता येणार नाही. काशीवारांचा पाठपुरावा सुरूचसाकोलीत नगर परिषद व्हावी यासाठी आमदार राजेश काशिवार यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी राज्यपालांनी साकोली नगर परिषदेची उद्घोषणा केली. परंतु आता राज्य निवडणूक आयुक्तांनी नगर पंचायत निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे साकोलीत नगर परिषदच व्हावी, यासाठी आमदार काशीवार यांनी पुन्हा एकदा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांची आयुक्तांशी चर्चाभंडारा जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारीया यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याशी गुरुवारला सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांनी साकोली नगर परिषदेच्या उदघोषणेविषयी आयुक्तांना अवगत केले. परंतु आयुक्तांनी जिल्ह्यातील चारही नगर पंचायतीविषयीची माहिती जाणून घेताना साकोली नगर परिषदेविषयी बोलण्याचे टाळले.