कामगारांच्या समस्या पोहचल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:01:10+5:30

तुमसर नगरपालिका अंतर्गत शारदा महिला मंडळ हिवरा बाजार ता. रामटेक जि. नागपूर या संस्थेला सफाई कंत्राट २०१७ पासून देण्यात आले आहे. येथील १६ सफाई कामगारांनी भविष्य निर्वाह निधी देण्याची व मासिक पगारवाढ करण्याची मागणी कंत्राटदाकडे केली होती. दरम्यान अचानक लॉकडाऊनच्या संकटकाळामध्ये कामगारांना कामावरून काढण्यात आले.

The problems of the workers reached the Collector's office | कामगारांच्या समस्या पोहचल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

कामगारांच्या समस्या पोहचल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

Next
ठळक मुद्देकंत्राटदाराची मुजोरी : अन्यायग्रस्तांसाठी शिवसेना सरसावली

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नगरपालिका तुमसर येथे सफाई कंत्राटदाराने दुलक्षीत केलेल्या त्या १६ कामगारांच्या समस्यांचा पाठपुरावा शिवसेनेमार्फत थेट जिल्हाधिकारी दालनात करण्यात आलेला आहे. कामावरुन नियमबाह्य पद्धतीने कमी करण्यात आलेल्या त्या सफाई कामगारांच्या समस्येची सुनावणी यापुर्वीही आयुक्तांच्या दालनात झाली होती. मात्र प्रशासकिय यंत्रणा व नियमांना न जुमानता त्या कंत्राटदाराने आपल्या मुजोरीचे उदाहरण दिले आहे. येथे कोरोनाच्या ताळबंदीच्या मोठ्या कालखंडात त्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याचीच दखल शिवसेनेने घेवून कामगारांच्या हक्काचा एक एल्गार जिल्हास्तरावर पुकारला आहे. येथे शासन व प्रशासनापेक्षा तो कंत्राटदार मोठा कसा? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात शिवसेनेने न्याय मिळण्याची मागणी कामगारांच्या बाजुने मांडली हे विशेष!
तुमसर नगरपालिका अंतर्गत शारदा महिला मंडळ हिवरा बाजार ता. रामटेक जि. नागपूर या संस्थेला सफाई कंत्राट २०१७ पासून देण्यात आले आहे. येथील १६ सफाई कामगारांनी भविष्य निर्वाह निधी देण्याची व मासिक पगारवाढ करण्याची मागणी कंत्राटदाकडे केली होती. दरम्यान अचानक लॉकडाऊनच्या संकटकाळामध्ये कामगारांना कामावरून काढण्यात आले.
सदर कामगारांची परिस्थिती हलाखीची असून त्यांना संपूर्ण परिवाराचे पालन, पोषण करणे कठीण झाले आहे. यासाठी कामगारांना कामावर घेऊन न्याय मिळवून देण्यात यावे. अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाची प्रत कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री सुनिल केदार यांना देण्यात आले आहे. यावेळी निवेदन सादर करताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. रवी वाढई, शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित मेश्राम, माजी उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, सफाई कामगार संतोष भोंडेकर, जितेंद्र भवसागर, मारोती बर्वे, गोविंद भोंडेकर, कमल कनोजे उपस्थित होते. अन्यायासाठी शिवसेना पदाधिकारी सरसावल्याने तुमसर येथील त्या कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

कामगारांची सुरक्षा हवेवर
सफाई कामगार भगवान चौधरी रा. गांधी नगर तुमसर यांचा २०१८ मध्ये मृत्यू झाला आहे. मात्र अजूनही त्यांच्या परिवाराला कोणतीही सुरक्षा, विम्याच्या मोबदला मिळाला नाही. जे कंत्राटदाराने नगरपालिकेशी केलेल्या करारनाम्यात नमूद केले आहे, ते कसलेही अटी शर्ती पूर्ण केले नाही.

Web Title: The problems of the workers reached the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.