शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
2
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
3
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
4
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
5
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
6
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
7
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
8
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
9
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
10
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
11
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
12
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
13
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
14
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
15
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
16
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
17
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
18
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
19
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
20
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचे पुन्हा संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत आहे. दिवाळीत झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेला धान उद्ध्वस्त झाला. या संकटातून सावरत नाही तोच गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकºयांच्या चिंतेत वाढ केली. हवामान खात्याने गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा दिला.

ठळक मुद्दे२४ तासात २० मिमी पाऊस : आधारभूत केंद्रावर उघड्यावरील धान ओला

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिवाळीत परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून रविवारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला. गत २४ तासात २०.२ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली. आधारभूत केंद्रावर उघड्यावरील धान ओलाचिंब झाला असून भाजीपाला पिकासह धानालाही मोठा फटका बसत आहे.
गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेत आहे. दिवाळीत झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेला धान उद्ध्वस्त झाला. या संकटातून सावरत नाही तोच गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली. हवामान खात्याने गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा दिला.
रविवारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला. २४ तासात २०.२ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस भंडारा तालुक्यात ३३.७ मिमी कोसळला. यात शहापूर मंडळात ३.२ मिमी, भंडारा १५ मिमी, धारगाव २ मिमी, बेला ९.३ मिमी, पहेला १.२ मिमी, खमारी ३ मिमी पावसाची नोंद झाली. मोहाडी तालुक्यातील मोहाडी मंडळात ११.६, वरठी ८.६, कांद्री १.२, आंधळगाव १.४ मिमी, कान्हळगाव १.८ मिमी असा एकूण २४.६ मिमी पाऊस कोसळला. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी मंडळात ५ मिमी, तुमसर ३.१ मिमी, सिहोरा ६.२ मिमी, मिटेवानी २.१ मिमी, गर्रा १४ मिमी असा एकूण ३०.४ मिमी पाऊस कोसळला. साकोली तालुक्यातील साकोली मंडळात ४ मिमी, एकोडी ९.८ मिमी, सानगडी ५ मिमी अशी एकूण १८.८ मिमी पावसाची नोंद झाली.
लाखांदूर तालुक्याच्या लाखांदूर मंडळात ४.२ मिमी, बारव्हा ३.६ मिमी, मासळ १६.२ मिमी अशी एकूण २४ मिमी आणि लाखनी तालुक्याच्या पोहरा मंडळात १.६ मिमी, लाखनी ५.२ मिमी, पालांदूर १ मिमी, पिंपळगाव २.२. मिमी अशी एकूण १० मिमी पावसाची नोंद झाली. आधारभूत केंद्रावर शेतकºयांची धान विक्रीसाठी प्रचंड गर्दी आहे. मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने अनेक शेतकºयाचा धान उघड्यावर आहे. रविवारी झालेल्या पावसाने शेतकºयांचा धान ओला झाला. यामुळे हा धान घरी नेवून वाळू घालण्याशिवाय शेतकºयांना पर्याय नाही. यासोबतच या पावसाने भाजीपाला व चुरणा झालेल्या धानाचेही नुकसान झाले.

आंधळगाव परिसरात धानाचे पुंजणे मातीमोल
आंधळगाव : मोहाडी तालुक्यातील आंधळगाव परिसरात रविवारी सायंकाळी ४ वाजता वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे धानाचे पुंजणे ओलेचिंब झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. चना, गहू, लाखोरी व तुरीच्या पिकाचीही मोठे नुकसान झाले आहे. फळ आणि भाजीपाला बागांचेही नुकसान झाले आहे.

पवनी तालुका निरंक
जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळल्याची नोंद आपत्ती नियंत्रण विभागाने केली आहे. सहा तालुक्यात पाऊस कोसळला असून पवनी तालुका मात्र निरंक आहे. सहा पैकी एकाही मंडळात पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
वातावरणात गारवा
४गत तीन दिवसांपासून ढकाळ वातावरण आणि रविवारी झालेल्या पावसाने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला. दिवसभर हुडहुडी भरणारी थंडी कायम होती. तापमान खालावल्याने थंडीत वाढ झाली. ग्रामीण भागात शेकोटी पेटल्याचे दृश्य दिसत होते.

टॅग्स :Rainपाऊस