शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या दूरावस्थेसंदर्भात प्रहार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

महामार्गावरून ये जा करताना अनेक किरकोळ अपघात दररोज घडतात. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरी कुणीही लक्ष न दिल्याने १६ आॅगस्टला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नेरलात आंदोलन केले.

ठळक मुद्देभंडारा-पवनी महामार्ग : अधिकारी, कंत्राटदारांनी दिले आश्वासन, बांधकामाला प्रारंभ


लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : वर्षभरापूर्वीपासून भंडारा-पवनी महामार्गाच्या रुंदीकरण बांधकाम सुरू आहे. पावसाच्या पाण्यामुळे नेरला ते अड्याळ या रस्त्यावर निकृष्ठ बांधकामामुळे येणाऱ्या जाणाऱ्या जनतेस त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरून ये जा करताना अनेक किरकोळ अपघात दररोज घडतात. संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरी कुणीही लक्ष न दिल्याने १६ आॅगस्टला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नेरलात आंदोलन केले.
या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, अशी ताठर भूमिका पवनी तालुकातील अड्याळ, नेरला येथील नागरिकांसह पहारच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर अधिकारी, कंत्राटदार, यांच्यासह पोलीसांचा ताफा आंदोलनस्थळी पोहचले. त्यांनी महामार्ग दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला. लवकरच एकेरी वाहतूक सुरु करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांनी केले. याप्रसंगी मंगेश वंजारी, दीपक पाल, विनोद वंजारी, अतुल राघोर्ते, विवेक माथूरकर, अक्षय तलमले, जितू मेश्राम, संदीप निबार्ते. विवेक विक्की खोटेले तालुका प्रमुख लाखनी, जितेंद्र भुरे, तालुका सचिव लाखनी, आशिष सहारे, स्वप्नील रणदिवे, अक्षय उके, राहुल रोहकर, शुभम शेंडे, प्रणय दिघोरे, सचिन लोहारे, राहुल नारनवरे, सुबोध मोटघरे, विशाल आरीकर, सचिन रणदिवे, मंगेश लुचे, प्रवीण लोहारे, शुभम लोहारे, वैभव मेश्राम, नंदू शहारे, राकेश अरीकर, निशांत रामटेके आदी उपस्थित होते.