पोलीस रुग्णालय वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:37 IST2021-09-03T04:37:23+5:302021-09-03T04:37:23+5:30

पोलीस रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा संपल्यानंतर त्यांना वाढीव मुदत देण्यात आली नाही. त्यामुळे दोन महिन्यांपासून या रुग्णालयात वैद्यकीय ...

Police hospital on the air | पोलीस रुग्णालय वाऱ्यावर

पोलीस रुग्णालय वाऱ्यावर

पोलीस रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा संपल्यानंतर त्यांना वाढीव मुदत देण्यात आली नाही. त्यामुळे दोन महिन्यांपासून या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कोरोना काळात या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तत्पर सेवा दिली होती. योग्य उपचार मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. आता मात्र हे रुग्णालय वाऱ्यावर आहे. रुग्णालयात फक्त एक आरोग्यसेवक कार्यरत आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याचे गांभीर्यपूर्वक विचार करून पोलीस रुग्णालयात रिक्त झालेले वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद तत्काळ भरण्यात यावे, या मागणीचे निवेदन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष पुंडलिक निखाडे, सचिव नवखरे, सईद शेख, माणिक घोडीचोर, माकडे, लांजेवार, लियाकत खान, शेंडे, सार्वे, श्रीवास व अन्य सदस्य उपस्थित होते.

Web Title: Police hospital on the air