शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दहा लाख थकविल्याने रचला लुटमारीचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 05:00 IST

धान व्यापाऱ्याचा दिवाणजी माशेट्टी श्रीनिवास भास्कर याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूच्या धाकावर २२ लाख ५९ हजार रुपये रोख लुटण्यात आले होते. एवढ्या मोठ्या लुटमारीची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा तपास भंडारा स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण व त्यांच्या पथकाने अवघ्या २४ तासात सर्वच्या सर्व आठ आरोपींना जेरबंद करून संपूर्ण रक्कमही हस्तगत केली. 

ठळक मुद्देमास्टरमाइंड रामदास आहे पाच ट्रकचा मालक

लाेकमत न्यूज नेटवर्कसाकोली : धान व्यापारी रमेश अण्णा याने ट्रक भाड्याचे १० लाख रुपये थकविल्याने लुटमारीचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. साकोली तालुक्यातील पळसगाव-गोंडउमरी मार्गावर मंगळवारी रात्री झालेल्या लुटमारीतील सर्व आरोपी जेरबंद झाले असून या घटनेचा मास्टरमाइंड रामदास भिरकड हा पाच ट्रकचा मालक आहे. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून उर्वरित सात जणांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. साकोली तालुक्यातील पळसगाव-गोंडउमरी मार्गावर धान व्यापाऱ्याचा दिवाणजी माशेट्टी श्रीनिवास भास्कर याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूच्या धाकावर २२ लाख ५९ हजार रुपये रोख लुटण्यात आले होते. एवढ्या मोठ्या लुटमारीची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा तपास भंडारा स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण व त्यांच्या पथकाने अवघ्या २४ तासात सर्वच्या सर्व आठ आरोपींना जेरबंद करून संपूर्ण रक्कमही हस्तगत केली. रामदास भिरकड हा नागपूर येथील रहिवासी असून हैद्राबादवरून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तांदूळ आणण्याचे काम करीत होता. त्याच्याकडे पाच ट्रक असून १० लाख रुपये रमेश अण्णाने थकविल्याने हा कट रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यासाठी त्याने आपल्या सहकाऱ्यांची मदत घेतली.ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी वायकर यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, साकोलीचे ठाणेदार जितेंद्र बोरकर व त्यांच्या पथकाने केली.

असा लागला छडा- दिवाणजीच्या सांगण्यानुसार घटनास्थळावर मोटारसायकल पडलेली होती. त्या बाजूला एक इसम झोपून होता. तेथून कार सहज निघून जाईल, अशी जागाही होती. परंतु चालकाने कार थांबविली. दोघेही खाली उतरले. तेव्हा दबा धरून बसलेले सात जण धावून आले. त्यांनी केवळ दिवाणजीच्याच डोळ्यात मिरची पावडर फेकली. चालकाला कोणतीही इजा केली नाही. यावरून पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसी हिसका दाखविताच पोपटासारखा बोलू लागला. साळ्याच्या घरी रक्कम- लुटमार केल्यानंतर आरोपी रामदासने संपूर्ण २२ लाख ६९ हजारांची रक्कम आपला साळा चेतन शिवणकर याच्या धर्मापुरी येथील घरी ठेवली होती. पोलिसांनी ती हस्तगत केली.

 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस