वैनगंगेवरील निर्माणाधीन पुलाचा पिलर कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 05:00 AM2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:01:05+5:30

माडगी शिवारातून वैनगंगा नदी वाहते. गत दोन वर्षापासून नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. नदीपात्रात १० ते ११ सीमेंट काँक्रीटचे पिलर बांधकाम सुरु आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास नदीच्या मध्यभागी असलेल्या पिलरचा लोखंडी सांगाडा अचानक कोसळला. वैनगंगा नदीवर १९६८ मध्ये पुल बांधण्यात आला होता. त्याच पुलावरून सध्या वाहतूक सुरु आहे.

The pillar of the bridge under construction on Waingange collapsed | वैनगंगेवरील निर्माणाधीन पुलाचा पिलर कोसळला

वैनगंगेवरील निर्माणाधीन पुलाचा पिलर कोसळला

Next
ठळक मुद्देमाडगीची घटना : मध्यरात्री घटना घडल्याने जिवितहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर - गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर वैनगंगा नदीवरील निर्मानाधिन पुलाचा पिलर मध्यरात्रीच्या सुमारास कोसळल्याची घटना माडगी (देव्हाडी) येथे घडली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. बांधकामाच्या गुणवत्तेवर येथे आता प्रश्नचिन्ह लागले आहे.
माडगी शिवारातून वैनगंगा नदी वाहते. गत दोन वर्षापासून नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. नदीपात्रात १० ते ११ सीमेंट काँक्रीटचे पिलर बांधकाम सुरु आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास नदीच्या मध्यभागी असलेल्या पिलरचा लोखंडी सांगाडा अचानक कोसळला. वैनगंगा नदीवर १९६८ मध्ये पुल बांधण्यात आला होता. त्याच पुलावरून सध्या वाहतूक सुरु आहे. परंतु राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर वाहतूक सुरु व्हावी यासाठी दुसऱ्या पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले. नदीचे पात्र येथे विस्तीर्ण असून दिवसा ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

बांधकाम कंपनी अधिकारी नॉट रिचेबल
पुलाचा पिलर कोसळल्याप्रकरणी प्रकल्प प्रभारी चौबे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल होते. दुसरे तांत्रिक अधिकारी रामेश्वर धाकड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. भंडारा येथील राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंत्यांचे या बांधकामावर नियंत्रण असल्याची माहिती आहे. परंतु त्यांच्याशीही संपर्क झाला नाही.

वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे बांधकाम केंद्रीय बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे राज्य शासनाचे अधिकारी येथे येत नाही. राज्य शासनाने येथे लक्ष देण्याची गरज आहे.
- गौरीशंकर पंचबुद्धे, सरपंच, माडगी

Web Title: The pillar of the bridge under construction on Waingange collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी