निवृत्तीधारकांनी संघटितपणे न्यायासाठी लढा द्यावा

By Admin | Updated: September 25, 2016 00:53 IST2016-09-25T00:53:58+5:302016-09-25T00:53:58+5:30

निवृत्तीधारकाच्या वाढत्या वयात काठीचा आधार म्हणजे पेंशन. जे जमत नाही त्यासाठी जागृक राहुन

Pensions should be organized jointly by the pensioners | निवृत्तीधारकांनी संघटितपणे न्यायासाठी लढा द्यावा

निवृत्तीधारकांनी संघटितपणे न्यायासाठी लढा द्यावा

संघाचे अधिवेशन : एच.एफ. चौधरी यांचे प्रतिपादन
जवाहरनगर : निवृत्तीधारकाच्या वाढत्या वयात काठीचा आधार म्हणजे पेंशन. जे जमत नाही त्यासाठी जागृक राहुन पेंशनमध्ये मिळणारी तफावत दुर करण्यासाठी संघटीत राहुन न्यायासाठी लोकशाही मार्गाने लढा द्यावा, असे प्रतिपादन एआयसीजीपीएचे सहायक राष्ट्रीय सचिव एच.एफ. चौधरी यांनी केले.
अखिल भारतीय केंद्रीय सेवानिवृत्ती कर्मचारी संघ एच.क्यु. पुणे शाखा भंडाराच्या वतीने ठाणा पेट्रोलपंप येथील बावणकुळे सभागृहात ३ रे द्विवार्षिक अधिवेशन प्रसंगी सहायक राष्ट्रीय सचिव एच.एफ. चौधरी बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन एआयसीजीपीएचे अध्यक्ष डब्ल्यु. एस. भोगे यांनी दिप प्रज्वलीत करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी भंडारा शाखेचे अध्यक्ष व्ही.बी. मुनिश्वर हे होते. यावेळी संघटन सचिव बी.जे. सरवर, आयुध निर्माणी विद्यालय जवाहरनगरचे माजी मुख्याध्यापक एम.जी. कनेर, ई.बी. बावनकुळे, योग प्रचारक यशवंत गायधने, डी.बी. वसानी, डी.जे. दलाल, पी.एम. भुरे, एस.एन. कावळे, बी.एल. मांडेकर, आर.एल. कारेमोरे, नामदेव घरत उपस्थित होते. बी.जे. सरवर यांनी निवृत्तीधारकांना पेंशन वेतीरिक्त मिळणारे योजनेची माहिती सविस्तरपणे विसद केले. राष्ट्रीय अध्यक्ष भोमे म्हणाले की, केंद्रीय कर्मचारी निवृत्तीधारकांनी आपल्या परिवारातील इतंभु माहिती नमुना ३ भरून द्यावी, कुटूंबातील अपंग, अविवाहित, घटस्फोटीत, विधवा मुलींना पेंशनचा लाभ मिळतो हे विशेष करून आपल्या संभाषणात सांगितले.
याप्रसंगी पेंशनरला घरभाडे, वैद्यकीय रक्कमेत वाढ, पेंशनरच्या वैद्यकीय खर्च सरकारने द्यावा. पे. मेट्रीक पेंशन त्वरीत लागू करून पेंशनरच्या खात्यात जमा करावी, अशी एकमुखी ठराव मंजुर करण्यात आले.
यावेळी भंडारा शाखेच्या वतीने संघटनेशी संलग्न ७५ वर्ष वरील ३० केंद्रीय कर्मचारी निवृत्तीधारकांचा सत्कार उपस्थित पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक कोषाध्यक्ष के.यु. पोकडे यांनी केले. संचालन सचिव जी.जी. कावळे यांनी केले. आभार डी.के. लाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जेष्ठ नागरिक संघ ठाणा जवाहरनगर, भंडारा शाखा यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Pensions should be organized jointly by the pensioners