शहरं
Join us  
Trending Stories
1
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
"२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा खोचक सवाल
4
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
5
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
6
Virat Kohli Record : किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! एका डावात ५ विक्रमांची नोंद
7
Cannes 2026: मराठमोळ्या अभिनेत्याने मान गर्वाने उंचावली! झळकला कान्सच्या रेड कार्पेटवर, म्हणाला...
8
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
10
Neet Exam Case: कन्सल्टन्सीच्या नावे शोधायचा सावज, शुभमने केले होते स्वत:चे ‘नीट’ ब्रॅण्डिंग
11
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
12
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
13
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
14
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
15
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
16
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
17
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
18
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
19
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
20
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित कामगारांना बंद काळातील पूर्ण वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:01 IST

तालुक्यात डोंगरी बूज व चिखला येथे जगप्रसिद्ध अशा मॅग्नीज खाणी आहेत. या दोन्ही खाणीत परिसरातील गर्रा, बघेडा, डोंगरी बु. बाळापूर, कुळमुरा, देवनारा, चिखली, आसलपाणी, मोठागाव, कारली, सुसूरडोह, येदरबुची, सुंदरटोला, चिखला, सीतासांवगी, गोबरवाही, राजापूर, नाकडोंगरी, आष्टी, लोभी, बावनथडी, पाथरी, कवलेवाडा आदी गावातील असंघटित कामगार कंत्राटी पद्धतीने काम करतात.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : कामगार कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे देशात लॉकडाऊन पुकारल्यामुळे तालुक्यातील डोंगरी (बुज.) व चिखला येथील मॅग्नीज खाणी बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी त्यात काम करणारे असंघटित कंत्राटदारीचे काम बंद झाल्यामुळे हजारो कामगार संकटात सापडले आहेत. त्यांना बंद काळातील पूर्ण पगार देण्यात यावा, अशी मागणी तुमर तालुका शिवसेनाच्या वतीने मॉयल प्रबंधक व कामगार कल्याण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे
तालुक्यात डोंगरी बूज व चिखला येथे जगप्रसिद्ध अशा मॅग्नीज खाणी आहेत. या दोन्ही खाणीत परिसरातील गर्रा, बघेडा, डोंगरी बु. बाळापूर, कुळमुरा, देवनारा, चिखली, आसलपाणी, मोठागाव, कारली, सुसूरडोह, येदरबुची, सुंदरटोला, चिखला, सीतासांवगी, गोबरवाही, राजापूर, नाकडोंगरी, आष्टी, लोभी, बावनथडी, पाथरी, कवलेवाडा आदी गावातील असंघटित कामगार कंत्राटी पद्धतीने काम करतात. मात्र लॉकडाउनमुळे गरिब कंत्राटी मजुरांना मॉयल प्रशासनाने कामावरून बंद केले. दरम्यानमॉयलची खाण सुरु झाल्याननंतरही त्यांना कामावर रुजू करून घेतले नाही. त्यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमध्ये बंद केलेल्या कामगारांना मालकांनी बंद काळातील पगार देण्यात यावा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र येथे पंतप्रधानांच्या निर्देशना तिलांजली देण्यात आली आहे.
याकडे मॉयल प्रबंधक व कामगार कल्याण अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून मॉयलच्या सीएसआर निधी कामगारांच्या कल्याणासाठी उपलब्ध करून घ्यावा, अन्यथा दुसरा पर्याय शोधवा लागेल, असा इशारा आहे.
शिष्टमंडळात शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश लसूनते, उपजिल्हा प्रमुख नरेश उचिबगले, राजेंद्र पटेल, शेखर कोतपलीवार, प्रकाश पारधी, अनिल द्रुगकर, सुरेश मलेवार, शहर प्रमुख नितीन सेलोकर, राजू निखाडे, उपतालुका प्रमुख शिवशंकर शेंदरे, आशिष उचिबघले, विभाग प्रमुख राखीचंद राहंगडाले, सत्यनारायण कामथे, मोहन ढोक, बलराम बावणे, यश कोलते, खजरुलाल नेताम, अनमोल बिसने, सागर पटले, कचरू नेताम आदींचा समावेश होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShiv Senaशिवसेना