शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पवनारा पूल पोचमार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST

तुमसर - नाकाडोंगरी कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा पूलाचा पोचमार्ग खड्डेमय झाला आहे. सदर खड्याने पूर्ण रस्ताच व्यापल्याचे येथे चित्र आहे. किमान खड्डे बुजविण्याचे सौजन्य तुमसर सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मॅग्नीज खाणीतील जड वाहने याच रस्त्यावरुन धावतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाहनधारकांत अपघाताची भीती आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांचा जीव धोक्यात : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर - नाकाडोंगरी मार्गावर पवनारा पूलाजवळील रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. या पूलाचे दोन वर्षापूर्वी बांधकाम झाले होते. पूलाचा पोचमार्ग धोकादायक झाला असून आंतरराज्यीय महामार्गाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.तुमसर - नाकाडोंगरी कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा पूलाचा पोचमार्ग खड्डेमय झाला आहे. सदर खड्याने पूर्ण रस्ताच व्यापल्याचे येथे चित्र आहे. किमान खड्डे बुजविण्याचे सौजन्य तुमसर सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मॅग्नीज खाणीतील जड वाहने याच रस्त्यावरुन धावतात. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाहनधारकांत अपघाताची भीती आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना जीव मुठीत घालून येथून मार्ग काढावा लागत आहे. खड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.रस्त्याची गिट्टी बाहेर आली आहे. त्यामुळे पोचमार्ग बांधकाम गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष नाही.जीव गेल्यावर दुरुस्ती करणार काय?तुमसर - नाकाडोंगरी मार्गावरील पवनारा पुलावरील रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून वाहनधारकांचा जीव गेल्यावर दुरुस्ती करणार काय? असा संतप्त सवाल केला जात आहे. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून रस्त्याचे दुरुस्ती करण्याची गरज आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक