शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:35 IST

केशोरी : जिल्ह्यात कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षकांना सेवेची सलग १२ वर्ष आणि २४ वर्ष पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि ...

केशोरी : जिल्ह्यात कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षकांना सेवेची सलग १२ वर्ष आणि २४ वर्ष पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणी मंजूर करण्याची प्रक्रिया मागील पाच वर्षांपासून रखडली होती. अखेर शासनाने निर्णय घेऊन विद्या प्राधिकरणाला सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासंबंधी सुचवले आहे. त्याकरिता जिल्ह्यातीेल शाळा मुख्याध्यापकांकडून माहिती मागविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे आता शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शासनमान्य माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक शाळेत मान्यताप्राप्त कार्यरत शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी मंजूर करण्यासाठी पात्र असलेल्या शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाची अट पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु, सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आजपर्यंत आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणीच्या लाभापासून वंचित होते.

संबंधीत शिक्षकांचे प्रस्ताव शाळा मुख्याध्यापकांकडून वरिष्ठ लेखाधिकारी शिक्षण विभाग यांच्याकडे पाठविण्यात आले होते. परंतु त्यांना सेवांतर्गत प्रशिक्षणाची अट पुढे करुन या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणीपासून वंचित ठेवण्यात आले होते.

त्यामुळे शिक्षकांना आर्थिक लाभ मिळाला नव्हता. आता शासनाने विद्या प्राधिकरणाला सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे आदेश दिल्यामुळे सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळा मुख्याध्यापकांकडून मागविण्यात आली आहे.

त्यामुळे शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शिक्षकांनाही आनंद झाल्याचे दिसून येत आहे.

ज्या वर्षीपासून संबंधित शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवड श्रेणीसाठी पात्र होते, त्यावर्षीपासून शिक्षकांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी शिक्षक भारती शाखा, अर्जुनी मोरगावचे अध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे आणि शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.