शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पवनीच्या युवकाने दिला परप्रांतियांना रोजगार

By admin | Updated: March 23, 2016 00:46 IST

होळी व रंगपंचमीला सण जवळ येताच साखरेपासून तयार करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे.

क्विंटलमागे ४०० रूपये मजुरी : गाठ्या निर्मितीला वेग, १५ वर्षांपासून व्यवसाय सुरू पवनी : होळी व रंगपंचमीला सण जवळ येताच साखरेपासून तयार करण्यात येणाऱ्या गोड गाठ्या निर्मिती व्यवसायाने जोर पकडला आहे. या वर्षी साखर महाग झाल्यामुळे गाठयाही महाग होणार आहेत. या वर्षी ८ ते १० टक्क्याने गाठ्या महागणार आहेत.होळी व धूलिवंदन सणानिमित्त नात्यातील व्यक्तींना विशेषत: लहान मुलांना साखरेपासून निर्मित गाठ्या देण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरु आहे. ती आजही सुरु आहे. शहरातील घोडेघाट वार्डातील रवींद्र शिवरकर हे मागील १४ वर्षापासून गाठया निर्मितीचे काम करतात. या व्यवसायात त्यांचे संपूर्ण कुटुंब मदत करतात.गाठ्या निर्मितीकरिता मोठया पिंपात साखरेचा पाक तयार करण्यात येतो. या पाकामध्ये साखर, पाणी, दुध आदी घातले जाते. हा पाक मोठया भट्टीवर गरम केल्यानंतर हा पाक विविध प्रकारच्या साच्यात घालून विवीध प्रकारच्या गाठयांची निमिर्ती केली जाते. या गाठया निर्मिती करण्याकरिता कानपूर, अलाहाबाद आदी ठिकाणच्या कुशल कारागिरांना आणले जाते. या कारागीरांची एक महिन्यापर्यंत राहण्याची जेवणाची व्यवस्था केली जाते. या कारागिरांना एक क्विंटल मागे ४०० रुपये मजूरी दिली जाते. एका दिवसात दोन क्विंटल गाठयांची निर्मीती केली जाते. याचे त्यांना ८०० रुपये मिळतात. एक क्विंटल साखरेच्या ९५ किलो गाठयांची निर्मीती होते. या गाठया २५, ५०, १००, २००, ५०० व १०० ग्रॅम वजनाच्या तयार केल्या जातात.रविंद्र शिवरकर यांनी २३ फेब्रुवारी गाठया निर्मीती सुरु केली आहे. या वर्षी जवळपास ७२ क्विंटल गाठ्यांची निर्मीती होण्याची अपेक्षा आहे. या गाठया भंडारा, लाखनी, भिवापूर, वडसा, उमरेड, ब्रम्हपूरी आदी शहरात पोहोचल्या आहेत. या व्यवसायात १० महिलांनाही रोजगार मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)