शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी

By admin | Updated: September 9, 2014 23:16 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र २४ बाय ८ दर्जात मोडत असून या आरोग्य केंद्राला एकूण १७ गांवे जोडलेली आहेत. त्यामुळे दिघोरी व परीसरातील सर्व रुग्ण उपचारासाठी दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे

दिघोरी/मोठी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र २४ बाय ८ दर्जात मोडत असून या आरोग्य केंद्राला एकूण १७ गांवे जोडलेली आहेत. त्यामुळे दिघोरी व परीसरातील सर्व रुग्ण उपचारासाठी दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतात. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाची खुप गर्दी होते. एकच वैद्यकिय अधिकारी असल्याने रुग्णांना बराच वेळ ताटकळत राहावे लागते.पावसाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील सर्वच गावात विषाणुजन्य आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व रुग्ण एकावेळी उपचारासाठी धाव घेतात. असे असतांना सुध्दा येथील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी रुग्णांना पुरेपुर सेवा देण्याचा भरपूर प्रयत्न करतात. एकाच वैद्यकिय अधिकाऱ्यावर संपुर्ण १७ गावांचा भार असल्यामुळे रुग्ण तपासणीला वेळ लागतो. अशातच कुणी जास्त आजारी रुग्ण असल्यास डॉक्टरांना त्याला वेळ दयावा लागतो. त्यामुळे इतर बाह्यरुग्ण तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना बराच काळ ताटकळत राहावे लागते. त्यासाठी अजून किमान एका वैद्यकिय अधिकाऱ्याची नेमणूक दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करावी अशी मागणी जनतेत जोर धरत आहे.याशिवाय येथील वैद्यकिय अधिकाऱ्याना विविध बैठकांना जावे लागते. आॅपरेशनच्या कॅम्प करावा लागतो त्यावेळी दवाखान्यात वैद्यकिय अधिकारी या नात्याने कुणीच उपस्थित नसतो येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज २५० ते ३०० च्या दरम्यान बाह्यरुग्ण तपासणी केली जाते यावरुन विषाणुजन्य आजारांची किती मोठ्या प्रमाणात परिसरात लागण झाली असेल याची प्रचिती येते.शासनाने रुग्णांना वेळेवर व कमि खर्चात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मीती केली. मात्र दिघोरी/मोठी येथे एकच वैद्यकियअधिकारी असल्यामुळे रुग्णंना वेळेवर सेवा मिळू शकत नाही. याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालुन दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अजून एका वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी दिघोरी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)