शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना ३३ टक्के आरक्षण बिल पारित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 05:00 IST

सभेत १५ सप्टेंबरला लोकल व पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करा या मागणीसाठी सौंदड (साकोली) येथे   रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भंडारातील पाणीप्रश्न,  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कंत्राटी परिचारिकांना पुनर्नियुक्ती, बेरोजगारी भत्ता, वनहक्क कायद्याअंतर्गत पट्टे आदी मागण्यां संबंधीचे मार्गदर्शन हिवराज उके यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बहुमत मिळाल्यास महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे बिल लोकसभेत पारित करू, असे आश्वासन लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने दिले होते. ते त्यांनी पाळले नाही म्हणून भंडारा पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करून महिलांना ३३ टक्के आरक्षण बिल लोकसभेत पारित करा, अशी मागणी करण्यात आली.भंडारा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भारतीय महिला फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने देशव्यापी ‘मागणी दिनानिमित्त’ रत्नाकर मारवाडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके, प्रियकला मेश्राम, ममता तुरकर, मनीषा तितीरमारे, गजानन पाचे यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत हिवराज उके यांनी १९९६ मध्ये भारतीय महिला फेडरेशनच्या नेत्या व भाकप खासदार गीता मुखर्जी यांनी लोकसभेत व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे म्हणून तत्कालीन  प्रधानमंत्री देवेगौडा यांच्या कारकिर्दीत  लोकसभेत बिल सादर केले. भाकप व  डावेपक्ष पक्ष वगळता सर्वांनी विरोध केला. मात्र, कालांतराने राज्यसभेत बिल पारित झाले. पण आज २५ वर्षे होऊनही लोकसभेत पारित होऊ शकले नाही, असे सांगितले.बिल लोकसभेत पारित करा,या मागणीच्या समर्थनार्थ भंडारा पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सभेत १५ सप्टेंबरला लोकल व पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करा या मागणीसाठी सौंदड (साकोली) येथे   रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भंडारातील पाणीप्रश्न,  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कंत्राटी परिचारिकांना पुनर्नियुक्ती, बेरोजगारी भत्ता, वनहक्क कायद्याअंतर्गत पट्टे आदी मागण्यां संबंधीचे मार्गदर्शन हिवराज उके यांनी केले.संचालन तालुका सचिव गजानन पाचे यांनी केले. आभार प्रदर्शन महिला फेडरेशनच्या सचिव ममता तुरकर यांनी केले. सभेत वामनराव चांदेवार, गणेश चिचामे, महादेव आंबाघरे, रमेश पंधरे, दिलीप ढगे, गोपाल चोपकर, नंदा कोसरकर, प्रज्ञा मेश्राम, मंगेश माटे, ताराचंद देशमुख, साधना आगासे, सीमा चौधरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

टॅग्स :reservationआरक्षण