शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

लाच प्रकरणी तलाठ्याला अटक

By admin | Updated: July 1, 2014 23:19 IST

शेतीविषयक कामकाज पूर्ण करण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी करणाऱ्या माडगी येथील तलाठी राजेंद्र रामचंद्र कदम याच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाने कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली.

भंडारा : शेतीविषयक कामकाज पूर्ण करण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी करणाऱ्या माडगी येथील तलाठी राजेंद्र रामचंद्र कदम याच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाने कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली. याबाबद असे की, तक्रारदाराने ग्राम शिवणी ता.तुमसर येथे असलेल्या १ हेक्टर ३१ आर शेतीपैकी बहिण देवांगणा गाढवे रा.कोष्टी हिला दीड एकर शेती लिहून दिलेली आहे. उर्वरीत शेती नावाने असली तरी ती वेगवेगळी करण्यात आलेली नाही. त्या शेतीवर पाच वर्षापूर्वी विहिर खोदून वॉटर पंप लावले आहे. परंतु या संबंधीची माहिती सातबारावर चढविलेली नाही. काम पूर्ण करण्यासाठी तलाठी रामचंद्र कदम यांनी चार हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने तलाठ्याला एक हजार रुपये दिले व उर्वरीत रक्कम काम झाल्यावर देण्याचे ठरले. तक्रारदाराने तलाठ्याला दूरध्वनी करून कामाबाबद विचारणा केली असता त्यांनी २७ तारखेला तलाठी कार्यालयात भेटण्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने संबंधित माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. विभागाने सापळा रचला.तक्रारदाराने तीन हजार रुप यांची लाच तलाठ्याला देण्याचा प्रयत्न केला. मात्र तलाठी यांनी तलाठी कार्यालयासमोर असलेल्या किराणा दुकानदाराकडे लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. ही कारवाई आज करण्यात आली. कारवाईदरम्यान तलाठी कदम यांनी तक्रारदारासोबत बोलण्याचे व भेटण्याचे टाळून लाच स्वीकारली नाही व पुढेही लाच रक्कम स्वीकारण्याची शक्यता दिसून येत नाही.म्हणून तुमसर पोलिसांनी तलाठी राजेंद्र कदम याला अटक करून त्याच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. कारवाई विभागाचे पोलीस उपायुक्त वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस उपअधीक्षक किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक सहा. फौजदार हेमंत उपाध्याय, अशोक लुलेकर, गौतम राऊत, भाऊराव वाडीभस्मे, सचिन हलमारे, शेखर देशकर, रसिका कंगाले, मनोज चव्हाण यांनी पार पाडली. (नगर प्रतिनिधी)