शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धान कापणीचा हंगाम जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 05:00 IST

यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. नाही म्हणता म्हणता सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने सरासरी गाठली. जिल्ह्यात आता सरासरीपेक्षा काही टक्के पाऊस कमी आहे. मात्र, काही भागात गरजेपुरताच पाऊस झाल्याने हंगाम समाधानकारक आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा माॅन्सून धुमाकूळ घालेल असा कयास होता. परंतु, परतीच्या पावसाचे संकट टळल्याचे दिसत आहे. त्यामुळे धान कापणी जोमात सुरू झाली आहे.

मुखरू बागडे लाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : धान कापणीच्या वेळी घोंगावणाऱ्या परतीच्या पावसाचे संकट टळल्याने आत शेत-शिवारात कापणीचा हंगाम जाेमात सुरू आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असले, तरी मजूरटंचाईचे संकट मात्र कायम आहे. एकाच वेळी सर्व शेतकरी कापणी करीत असल्याने मजुरीचे दर वाढले असून कापणीसाठी एकरी १६०० ते १७०० रुपये मोजावे लागत आहे.यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. नाही म्हणता म्हणता सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने सरासरी गाठली. जिल्ह्यात आता सरासरीपेक्षा काही टक्के पाऊस कमी आहे. मात्र, काही भागात गरजेपुरताच पाऊस झाल्याने हंगाम समाधानकारक आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा माॅन्सून धुमाकूळ घालेल असा कयास होता. परंतु, परतीच्या पावसाचे संकट टळल्याचे दिसत आहे. त्यामुळे धान कापणी जोमात सुरू झाली आहे. ११० ते १३० दिवसांचे धान लाखनी तालुक्यातील चूलबंद खोऱ्यात कापणीला आलेले आहेत. धान कापणीसाठी महिला मजुरांना १५० ते १७० रुपये मजुरी आहे. तर पुरुषांना २५० ते ३०० रुपये मजुरी दिली जात आहे. ठेका पद्धतीत एकरी कापणी, बांधणीचा दर ३२०० ते ३४०० रुपयांपर्यंत आहे. हलके व मध्यम कालावधीचे धान एकाच वेळी कापणी, बांधणीला  आल्याने मजूरटंचाई जाणवत आहे. खरीप हंगामात यांत्रिक कापणी, मळणी अपेक्षित पद्धतीने जमत नसल्याने यंत्र उभी आहेत. पंधरा दिवस धानाचा हंगाम वेग घेणार आहे.

धान पिकावर कीडीचा प्रादुर्भाव! - सप्टेंबर महिन्यात नियमित व जोरदार पावसाने हजेरी लावल्याने धान पिकावर तुडतुडा, मावा, लाल लोंबी, पांढरी लोंबी यांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. शेतकऱ्यांनी महागडे कीटकनाशक फवारणी करूनही काही शेतकऱ्यांना शून्य फायदा अनुभवायला मिळालेला आहे. खोडकिडीचा नवीनच प्रकार या वर्षात धान पिकात अनुभवयाला आलेला आहे. गतवर्षी आंध्र प्रदेशात या खोडकिडीच्या रोगाचे चिन्ह दिसली होती. त्याच खोडकिडीचे रुप भंडारा जिल्ह्यातील काही शेतात भात शास्त्रज्ञांना अनुभवायला मिळालेली आहे. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती