शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाने उडाली धान उत्पादकांची झोप

By admin | Updated: October 25, 2014 22:34 IST

आनंदाचा पर्व दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात असतानाच, अचानक आलेल्या ढगाळ वातावरणामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. आज पहाटेपासुनच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी

भंडारा : आनंदाचा पर्व दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात असतानाच, अचानक आलेल्या ढगाळ वातावरणामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. आज पहाटेपासुनच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धान कापणी झालेल्या तसेच कापणी अवस्थेत असलेल्या धान पिकासह तूर पिकावर संकट ओढावले आहे.भंडारा जिल्हा धान कोठार म्हणून प्रसिध्द आहे. परंतु मागील पाच वर्षांपासून जिल्ह्याला दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांची पेरणी धोक्यात आली होती. शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी केली. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांनी रोवणी आटोपली. परंतु निसर्गाचा प्रकोप आणि किडींचा प्रादुर्भाव त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. महागडी औषधी खरेदी करून शेतकऱ्यांनी पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु आजही किडींचे आक्रमण सुरूच आहे. भितीपोटी शेतकऱ्यांनी धान कापणीला प्रारंभ केला. शेतामध्ये कडपा पडलेल्या आहेत. यातच आज सकाळपासून ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली. परिणामी शेतकरी धास्तावला आहे. जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून झालेल्या वातावरण बदलामुळे विविध आजारांचे रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण भागासह शहरातील अनेक रूग्ण खासगी तसेच शासकीय रूग्णालयात तपासणी करताना दिसून येत आहेत. सर्दी, खोकला, ताप, अंग दुखणे आदी लक्षणे असणारी रूग्ण अधिक प्रमाणात आहेत. (शहर प्रतिनिधी)