शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

युनिव्हर्सल फेरो बंद प्रकरणी कंपनी मालक जबाबदार

By admin | Updated: June 4, 2016 00:25 IST

तालुक्यातील युनिव्हर्सल फेरो कारखाना तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या काळपासुनच बंद असून सत्तेचा मनमानी उपभोग घेणाऱ्या ...

चरण वाघमारे यांची माहिती : परिसरातील बेरोजगारांना मिळणार काम, कारखाना पूर्ववत सुरू होणारतुमसर : तालुक्यातील युनिव्हर्सल फेरो कारखाना तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या काळपासुनच बंद असून सत्तेचा मनमानी उपभोग घेणाऱ्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या हेतूपुरस्पर अक्षम्य दुर्लक्षामुळेच युनिव्हर्सल फेरो कारखान्याला घरघर लागली यास तत्कालीन सत्ताधाऱ्यांचेच सरकार जबाबदार आहे. सदर युनीव्हर्सल फेरो कारखाना प्रकरण कंपनी मालकास जबाबदार धरुन सदर कारखाना पुर्ववत सुरु करण्यास प्रयत्नरत असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली आहे.औद्योगिक अ‍ॅक्टनुसार ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत अशा अनुकूल परिसरात उद्योग स्थापन करण्याचा नियम आहे. त्यानुसार जे उद्योजक उद्योग स्थान करण्यास तयार असतात. अशा उद्योजकांना औद्योगिक अ‍ॅक्ट संहितेमधील अटी, शर्ती व नियमांचे अधीन राहून व सर्व अटी, शर्तीची पूर्तता करुन उद्योग उभारावे लागते. यासाठी हमी पत्रही लिहून द्यावे लागते. सर्व अटी, शर्तीची पूर्तता करुनच युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु झाला असेल तर तो कारखाना सतत नियमितपणे सुरु ठेवणे ही कंपनी मालकाची नैतिक जबाबदारी आहे. पंरतू कोणतेही सबळ कारण नसतांना सरकारची दिशाभूल करुन कारखाना बदं करणे हे गैर आहे. युनिव्हर्सल फेरो कारखाना काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळपासून बंद असून तत्कालीन सत्ताधाऱ्यांचेच हा कारखाना सुरु करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. तत्कालीन सत्ताधाऱ्यांन सदर कारखाना सुरु करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले नाही. त्यामुळे कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली. यास तत्कालीन सत्ताधाऱ्यांचे उपेक्षीत धोरण कारणीभूत असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. युनिव्हर्सल फेरो कारखाना बंद असल्याचे निदर्शनास येताच आमदार वाघमारे यांनी युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु व्हावा यासाठी दीड वर्षाच्या कार्यकाळात विधानसभेत तीन वेळा प्रश्न उपस्थित करुन शासन प्रशासनाचे लक्ष वेधले. उद्योगमंत्री सुभाष देसाई व जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठका घेतल्या मात्र कंपनी मालक उपस्थित न झाल्याने निर्णय प्रलंबित राहीला. उद्योगमंत्री देसाई काही तकलादू राजकीय विरोधात भविष्यात श्रेय कसा मिळेल यासाठी केविलवाना प्रयत्न करीत आहेत.याबाबत मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे समवेत सांगोपांग चर्चा करण्यात आली असून त्यांनी याप्रकरणी शक्य तितक्या लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. युनिव्हर्सल फेरो कारखान्याकडे तत्कालीन तकलाूद सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष का केले, असा प्रश्न आमदार वाघमारे यांनी उपस्थित केला असून याप्रकरणी कंपनी मालकास जबाबदार धरुन सदर कारखाना पूर्ववत सुरु करण्यास प्रयत्नरत असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)