शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वासाने केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

अनेक रुग्ण कोरोनावर मात करुन बरे देखील होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे. गोंदिया येथील एका कोरोना बाधीत युवकाने आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन बाळगून कोरोनावर मात केली. त्याचा २८ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने घराबाहेर पडत मोकळा श्वास घेतला.

ठळक मुद्दे२८ दिवसानंतर घेतला मोकळा श्वास : सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्रस्त आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी शासन, प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अनेक रुग्ण कोरोनावर मात करुन बरे देखील होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे. गोंदिया येथील एका कोरोना बाधीत युवकाने आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन बाळगून कोरोनावर मात केली. त्याचा २८ दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने घराबाहेर पडत मोकळा श्वास घेतला.
गोंदिया येथील एक तरुण आपल्या मित्रांसह थायलंड येथे पर्यटनासाठी गेला होता. तो १७ मार्चला रायपूर मार्गे गोंदियाला परतला. मात्र त्याच्यासोबत गेलेले राजनांदगाव येथील दोन मित्र कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे २५ मार्चला जिल्हा आरोग्य विभागाने त्याला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करुन त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले.
यात त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात १४ दिवस क्वारंटाईन करुन उपचार करण्यात आले. त्याने उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. त्याचा १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या स्वॅब नमुन्याच्या पुन्हा तिनदा चाचणी करण्यात आली.
यात त्याचा चाचणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. त्यामुळे त्याला १० एप्रिलला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर त्याला १४ दिवस घरीच क्वारंटाईन राहण्याची व फिजीकल डिस्टन्सिंग पाळण्याची सूचना दिली. त्याने डॉक्टरांनी दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन केले.
९ मे ला त्याचा २८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. यानंतर त्याने प्रथमच घराबाहेर पाऊल टाकत मोकळा श्वास घेतला.

२८ दिवसांनी जिवन जगण्याचा धडा शिकविला
मला कोरोनाची बाधा झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मी घाबरलो नव्हतो. मात्र यामुळे आपल्या कुटुंबियांना झालेला त्रास हे कधीच विसरु शकत नाही. मात्र अशाही स्थितीत माझ्या कुटुंबियांनी मला नेहमीच धीर दिला. तर कोरोनावर मी निश्चित मात करणार हा सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास बाळगला. त्यामुळे कोरोनावर मला मात करता आली. मात्र या २८ दिवसांनी मला जिवन जगण्याचा धडा शिकविला असे त्या कोरोनामुक्त झालेल्या तरुणांने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या