शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
3
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
4
हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 
5
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
6
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
7
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
8
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
9
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
10
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
11
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
12
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
13
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
14
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
15
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
16
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
17
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
18
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
19
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
20
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक पवनीच्या पर्यटन विकासासाठी आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

मंगळवारी खासदार सुनील मेंढे यांनी दिल्ली येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह पवनी येथील पर्यटन स्थळाची पाहणी केली. पवनी शहराला विदर्भाची काशी म्हणून ओळख आहे. पवन राजाच्या ऐतिहासिक किल्ला असून सम्राट अशोकाचे वास्तव्य होते. अशा या ऐतिहासिक शहराच्या विकास मात्र गेल्या कित्येक वर्षापासून रखडला आहे. आता खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात टुरिझम सर्किट तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देटुरिझम सर्किटसाठी प्रयत्न : सुनील मेंढे यांच्यासह पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या पवनी येथे पर्यटन विकासाला मोठी संधी असून येथे पर्यटन विकासासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी मंगळवारी खासदार सुनील मेंढे यांनी दिल्ली येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह पवनी येथील पर्यटन स्थळाची पाहणी केली.
पवनी शहराला विदर्भाची काशी म्हणून ओळख आहे. पवन राजाच्या ऐतिहासिक किल्ला असून सम्राट अशोकाचे वास्तव्य होते. अशा या ऐतिहासिक शहराच्या विकास मात्र गेल्या कित्येक वर्षापासून रखडला आहे. आता खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात टुरिझम सर्किट तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पवनी शहराच्या आसपास आलेला पर्यटन वाढीला पुरक ठिकाणांचा अभ्यास केला जात आहे. यासंदर्भात दिल्ली येथील पुरातत्व विभागाचे अधिकारी टी. जे. अलोने नागपूर येथील संरक्षण अभियंता मिलिंद अंगाईतकर, पवनीचे तहसीलदार गजानन काकोर्डे यांनी पवनी शहराची पाहणी केली. यावेळी पवनी येथील किल्ला पुरातन मंदिरे, नदीघाटाची पाहणी केली. येथे पर्यटन विकासाला भरपूर वाव असून लवकरच येथे पर्यटन विकासाला प्रारंभ केला जाईल, असे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले. त्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
पवनी शहराच्या परिसरात पर्यटन वाढीच्या ठिकाणांचा अभ्यास पुरातत्व विभागाची चमू करणार असून त्याचा विस्तृत आराखडा तयार केला जाणार आहे. पवनी येथील पर्यटन स्थळ विकसित झाल्यानंतर स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान कालबध्दरितीने या पर्यटन विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांनी प्रयत्न सुरु केले आहे. स्थानिक प्रशासन देखील यामध्ये सहभागी होत असल्याची माहिती खासदार मेंढे यांनी यावेळी दिली.
पवनी शहराची पाहणी करताना अनील मेंढे, राजेंद्र फुलबांधे, अमोल तलवारे, मयूर रेवतकर, दीपक तिघरे, दिगांबर वंजारी, सचीन शहारे, संकुल शहारे, महेश फुंडे, मच्छींद्र हटवार, संदीप समर्थ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक