शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

भूविकास बँकेतील साहित्य जप्तीचे आदेश

By admin | Updated: November 26, 2015 00:35 IST

शासनाने राज्यातील शिखर बँकेसह २९ जिल्ह्यातील भूविकास बँक बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

भंडारा : शासनाने राज्यातील शिखर बँकेसह २९ जिल्ह्यातील भूविकास बँक बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर असून अनेकांना सक्तीने पदमुक्त करण्यात येत आहे. अशास्थितीत भंडारा येथील कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिवाणी न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. यात न्यायमुर्ती एम. एस. लोणे यांनी, कर्मचाऱ्यांची रक्कम देण्यास असमर्थ असलेल्या बँकेचे साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले आहे. अवसायानात निघालेल्या भूविकास बँकेत कार्यकरत कर्मचारी सेवाशर्तीनंतर निवृत्त झालेत. असे अनेक कर्मचारी सेवानिवृत्ती रक्कम, अतिरिक्त महागाई वाढ रक्कम, रजा वेतन, पी.एफ व अन्य लाभाच्या रक्कमेपासून वंचित आहेत. यामुळे भंडारा जिल्ह्यातील ३० सप्टेंबर १९९८ ते ३१ जानेवारी २००८ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या ४४ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या लाभासाठी बँक व्यवस्थापानाशी अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांना लाभाचा मोबादला मिळाला नाही. यामुळे शासन दरबारी उंबरठे झिझविल्यानंतर हतबल झालेल्या व्ही. एन. बोरकर, व्ही. एच. डहाके, टी. के. बांडेबुचे, एस. बी. निंबार्ते, डी. बी. हटवार, डी. एस. बांते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात बँकेचे जिल्हा व्यवस्थापक, तत्कालीन अध्यक्ष, त्यानंतरचे प्रशासक व विद्यमान अवसायक, शिखर बँके मुंबई व नागपूर विभागीय व्यवस्थापक यांच्याविरूध्द याचिका दाखल केली होती. याचिका दाखल केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भूविकास बँकेचे माजी जिल्हा व्यवस्थापक, लिपीक, शिपाई व अन्य प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना बँकेकडे असलेली १ कोटी ४४ लाख २१ हजार ९७७ रूपयांची थकीत रक्कम घेणे होती. नागपूर खंडपिठाने ४४ कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. यानंतर शिखर बँकेने त्यांच्या निकषानुसार केवळ आठ कर्मचाऱ्यांना आर्थिक मोबदला दिला. उर्वरित ३६ कर्मचाऱ्यांना शिखर बँकेने जिल्हा विभाजनानंतरचे कर्मचाऱ्यांशी त्यांचा संबंध नाही. असे म्हणत ते निकषात बसत नसल्याचे कारण सांगून शिखर बँकेने हातवर केले. याविरूध्द अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. यावर भंडारा येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. एस. लोणे यांनी कर्मचाऱ्यांची बाजू ऐकूण घेतली व त्यांच्या बाजूने निकाल देताना, बँकेने कर्मचाऱ्यांची १ कोटी ३६ लाखांची थकीत रक्कम देण्याचे आदेश दिले. हा निकाल न्यायमुर्ती लोणे यांनी १७ निकाली काढला. रक्कम देण्यास असमर्थ असल्यास बँकेचे साहित्य जप्त करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम देण्यासंदर्भात जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिल्याचे न्यायालयाचे हे कदाचित राज्यातील पहिलेच प्रकरण असावे. या निकालामुळे बँक व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. अरूण बावनकर यांनी बाजू मांडली. (शहर प्रतिनिधी)