साकोलीत रेतीची खुलेआम तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:19+5:302021-02-05T08:39:19+5:30

साकोली तालुक्यात चुलबंद नदीचे वस्तीर्ण पात्र आहे. मोठ्या प्रमाणात रेती आहे. मात्र घाटांचे लिलाव झालेच नाही. त्यामुळे तस्करांना मोकळे ...

Open smuggling of sand in Sakoli | साकोलीत रेतीची खुलेआम तस्करी

साकोलीत रेतीची खुलेआम तस्करी

साकोली तालुक्यात चुलबंद नदीचे वस्तीर्ण पात्र आहे. मोठ्या प्रमाणात रेती आहे. मात्र घाटांचे लिलाव झालेच नाही. त्यामुळे तस्करांना मोकळे रान आहे. परसोडी, पोवारटोली, महालगाव, उमरी, गोंडउमरी या घाटांवरून दररोज अहोरात्र रेतीची तस्करी होत आहे. शेकडो वाहनांच्या मदतीने रेतीची वाहतूक केली जाते. या प्रकाराबाबत अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट रेती तस्कर महसूल विभागाच्या कारवाईला घाबरत नसल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी दोन ठिकाणी चौक्या उभारल्या. परंतु या चौकीचाही उपयोग होताना दिसत नाही. महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले होते. मात्र राजरोसपणे सुरू असलेल्या टिप्पर व ट्रकवर खास मेहरबानी दिसत आहे. सहा महिन्यात एकाही टिप्परवर कारवाई केली नाही.

Web Title: Open smuggling of sand in Sakoli