शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

पहिल्या वर्गात ७१ टक्के मुलांचा ऑनलाईन प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:00 AM

जिल्ह्यात पहिल्या वर्गात दाखलपात्र मुला-मुलींची संख्या १३ हजार ७२७ आहे. मे महिन्याच्या २५ दिवसात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळात वर्ग पहिलीचे ९ हजार ७३४ विद्यार्थ्यांचा म्हणजेच दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी ७०.९० टक्के विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चीत झाला आहे.

ठळक मुद्दे९७३४ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चीत। पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव बघता पहिल्या वर्गात ऑनलाईन प्रवेश देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. गुढीपाडव्यापासून सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया यंदा १ मेपासून सुरू करण्यात आली. जिल्ह्यात पहिल्या वर्गात दाखलपात्र मुला-मुलींची संख्या १३ हजार ७२७ आहे. मे महिन्याच्या २५ दिवसात गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळात वर्ग पहिलीचे ९ हजार ७३४ विद्यार्थ्यांचा म्हणजेच दाखलपात्र विद्यार्थ्यांपैकी ७०.९० टक्के विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चीत झाला आहे.गोंदिया जिल्ह्यात दाखलपात्र १३ हजार ७२७ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ३३ मुले तर ६ हजार ७२२ मुली आहेत. यापैकी ४ हजार ९१७ मुले व ४ हजार ८६६ मुलींनी असे ९ हजार ७३४ चिमुकल्यांचा पहिल्या वर्गात ऑनलाईन प्रवेश झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात दाखलपात्र असलेल्या मुलामुलींपैकी ७०.९० टक्के मुलामुलींनी ऑनलाईन प्रवेश घेतला आहे. जिल्ह्यातील ‘वर्क फ्रॉम होम ऑनलाईन स्टडी’ राज्यभर गाजला. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक केंद्रात काही उपक्रमशील शाळा असून या शाळांमध्ये इंग्रजी शाळांपेक्षा दर्जेदार शिक्षण दिले जाते. अनेक शाळांतील प्राथमिक वर्गांना नर्सरी व केजीचे वर्ग जोडण्यात आले आहे. याद्वारे दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. यामुळे त्या शाळांची पटसंख्या सुद्धा वाढली आहे.जि.प.शाळांतील विद्यार्थी संख्या घटू नये यासाठी यंदापासून वर्ग पहिलीत ऑनलाईन प्रवेश देण्यास सुरूवात केली आहे. आमगाव तालुक्यात ८७ शाळांत ८१६, सालेकसा तालुक्यात ८८ शाळांत ६८०, देवरी तालुक्यातील १३३ शाळांत १०३८ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यात १०२ शाळांत १ हजार ६९, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १२० शाळांत १ हजार ३०९, गोरेगाव तालुक्यात १०२ शाळांत ९९६, तिरोडा तालुक्यात १४२ शाळांत १ हजार ५१४ व गोंदिया तालुक्यात २०२ शाळांत ९९६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेतला आहे.प्रत्येक शाळेत डिजीटल साधन असून त्याचा नियमित वापर करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने (महाराष्ट्र शासन) दिक्षा अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज ऑनलाईन अभ्यासक्र म शिकविले जाते. यातूनच आता १ मेपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

टॅग्स :Schoolशाळा