शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

२१ गावांमध्ये शंभर टक्के नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. आतापर्यंत ८ लाख ६६ हजार ८२७ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ७६ हजार ७०० तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९० हजार २३५ आहे. जिल्ह्यातील २१ गावांमधील शंभर टक्के ग्रामस्थांचे लसीकरण झाले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, गावागावांमध्ये लसीकरण सुरु आहे. जिल्ह्यातील २१ गावांमधील १०० टक्के ग्रामस्थांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रभावीपणे मोहीम राबवली. या मोहिमेचे हे यश होय. भंडारा जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. आतापर्यंत ८ लाख ६६ हजार ८२७ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ७६ हजार ७०० तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९० हजार २३५ आहे. जिल्ह्यातील २१ गावांमधील शंभर टक्के ग्रामस्थांचे लसीकरण झाले आहे. त्यात भंडारा तालुक्यातील लोहारा, पेवठा, मोहाडी तालुक्यातील किसनपूर, कांद्री, वासेरा, तुमसर तालुक्यातील महालगाव, रेंगेपार, लाखनी तालुक्यातील घोडेझरी, कोलारा, खराशी, भूगाव, कोलारी, सोमनाळा, साकोली तालुक्यातील वलमाझरी, मालूटोला, सालई, लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, दहेगाव, मासळ, पुयार आणि पवनी तालुक्यातील गोसे गावाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. माधुरी माथुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच हे यश मिळाले आहे. नागरिकांनी तत्काळ लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेच्यावतीने लसीकरणासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ७६ हजार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु असून, ९ लाख ६५ हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ७६ हजार ७०० होती तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९० हजार २३५ आहे. त्यात पुरुषांची संख्या ४ लाख ३० हजार ४ तर महिलांची संख्या ४ लाख ३६ हजार ८२३ आहे.  - जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटात ५८ हजार ५२८ जणांनी, ४५ ते ५९ वयोगटात २ लाख ४८ हजार १६९ जणांनी, ६० वर्षावरील २ लाख ११ हजार ५५९ व्यक्तींनी लस घेतली आहे. आरोग्य विभागातील २० हजार ४९७ आणि फ्रन्टलाईन वाॅरियर असलेल्या २८ हजार २१० कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. कोव्हॅक्सिन लसीचे ३ लाख ७७ हजार ९३९ डोस तर कोविशिल्डचे ४ लाख ८८ हजार ९९६ डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या