लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात भेंडीचे भरघोस उत्पादन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:01:15+5:30

लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील पालांदूर मऱ्हेगाव, वाकल, लोहारा, पाथरी आदी चुलबंद खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे मळे, बाग सजलेल्या आहेत. दररोज हजारो किलो भाजीपाला तोडला जातो. मात्र विक्रीसाठी आठवडी बाजार स्थानिक परिसरात बंद असल्याने भाजीपाल्याला अपेक्षित उठाव नाही. मागणी नसल्याने भाव नाही.

Okra production in Chulband valley of Lakhni taluka! | लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात भेंडीचे भरघोस उत्पादन!

लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यात भेंडीचे भरघोस उत्पादन!

Next
ठळक मुद्देभाव मात्र अत्यल्प : लॉकडाऊनचा नकारात्मक परिणाम, भेंडी उत्पादकांना भाववाढीची आशा

मुखरू बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भाजीपाल्याचा शेतकरी, बळीराजा स्वत: पिकवित इतरांना शुद्ध ताजा भाजीपाला पुरवीत आहे. मात्र कोरोणाच्या संकटात सदाबहार असलेला शेतकरी भाजीपाल्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने सुमार संकटात सापडला आहे. पडलेल्या भावाने विक्री खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकरी आज उद्या भाव वाढण्याच्या आशेने आपले बाग मात्र नुकसान सहन करीत सांभाळीत आहे.
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरातील पालांदूर मऱ्हेगाव, वाकल, लोहारा, पाथरी आदी चुलबंद खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे मळे, बाग सजलेल्या आहेत. दररोज हजारो किलो भाजीपाला तोडला जातो. मात्र विक्रीसाठी आठवडी बाजार स्थानिक परिसरात बंद असल्याने भाजीपाल्याला अपेक्षित उठाव नाही. मागणी नसल्याने भाव नाही.
जिल्ह्याच्या मंडीत नेण्याकरिता साधन अपुरी असून दराचा विचार करता परवडणारे नाही, त्यामुळे करावे काय या विवंचनेत स्थानिक ठिकाणीच गावोगावी सायकल, मोटारसायकल, हातठेले, डोक्यावरून माल वाहतूक करीत भाजीपाला विकणे सुरू आहे. भेंडीला सहा रुपये किलो असा दर मिळत असल्याने शेतकºयाला नुकसान सहन केल्याशिवाय पर्याय उरला नाही. वांगे केवळ दोन रुपये ते चार रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
स्थानिकच्या मजुरांना हाताशी धरून लॉकडाऊनच्या संकटात उन्ह व पावसाची काळजी घेत अगदी पहाटेपासूनच शेतकरी मजुरांसोबत बांधावर हजेरी लावीत आहे. संकटात असलेल्या उत्पादकांना मदतीची अपेक्षा आहे.

भेंडी पीक उत्पादनाला परवडणारे असून एक दिवस आड तोडा करावा लागत असतो. त्यामुळे भेंडीचे पीक परवडणारे आहे. मात्र भेंडीला किमान १० रुपयांच्यावर भाव असणे अपेक्षित आहे. प्रतिकिलो उत्पादन खर्च सात रुपये किलो एवढा अपेक्षित आहे. सव्वा एकरात भेंडीचे जोमदार पीक असून उत्पादनही एकदम चांगले आहे. पण कोरोनाच्या सावटात आठवडी बाजार बंद असल्याने भेडी विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
-घनश्याम भेदे, भेंडी उत्पादक, पालांदूर.
दीड एकरात भेंडी व चवडी लागवड केली असून माल, भाजीपाला निघण्यास सुरुवात झालेला आहे. पावसाळ्याकरिता सुद्धा वांग्याची मल्चिंग पेपर वर बाग लावलेली आहे. कोरोनाचे संकट दूर होईल, या आशेने गत तीन महिन्यापासून प्रयत्न करूनही संकट टळेनासे झाल्याने भाव मिळेल की नाही, ही शंका मनाला त्रास देत आहे. बागायतीला अपेक्षित खर्च लागलेलाच आहे. मात्र त्या तुलनेत भाजीपाल्याला भाव नसल्याने कर्जाचे डोंगर मोठे होत आहे.
-प्रशांत खागर, बागायतदार, पालांदूर.

Web Title: Okra production in Chulband valley of Lakhni taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.