शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या पाण्यावर तेलाचा तवंग

By admin | Updated: April 28, 2017 00:27 IST

एकेकाळी भंडारा जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेली वैनगंगा नदी आता दिवसेंदिवस जीवघेणी ठरू लागली आहे.

नदीपात्रातील पाणी प्रदूषित : रसायनमिश्रीत पाण्यात स्लो पॉयझन नंदू परसावार भंडारा एकेकाळी भंडारा जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेली वैनगंगा नदी आता दिवसेंदिवस जीवघेणी ठरू लागली आहे. मागील दोन वर्षांपासून नाग नदीच्या पाण्याने दूषित झाल्यानंतर ईकार्निया या वनस्पतीने नदीपात्रात आक्रमण केले. आता कारधाजवळील एका कारखान्यातील रसायनमिश्रीत पाण्यामुळे नदीपात्रावर तेलाचा तवंग दिसत आहे. राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यताप्राप्त गोसेखुर्द धरण पूर्ण होऊन या धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे या दिशेने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या धरणात २४५ मीटरपर्यंत जलस्तर वाढविण्याचे काम सुरू झाले होते. जलस्तर वाढविण्याचे काम सुरू झाल्यामुळे बॅकवॉटरमुळे वैनगंगा नदीपात्रात पाणीच पाणी दिसत होते. मागील दोन वर्षे नदीपात्रात सहा मीटर जलसाठा होता. दरम्यान नागनदीचे प्रदूषित पाणी, भंडारा शहरातील सांडपाणी आणि या दूषित पाण्यामुळे उगवलेल्या ईकार्निया वनस्पतीमुळे नदीपात्र अस्वच्छ झाले. आता धरणातील पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्रातील जलस्तर कमी झाला आहे. शहरालगतच्या कारखान्यातील रसायनमिश्रीत पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे नदीतील पाण्यावर तेलाचा जाडसर तरंग दिसू लागला आहे. ईशाऱ्यानंतरही पाणी प्रदूषितच नाग नदीचे प्रदूषित पाणी गोसेखुर्द धरणात सोडण्यात येऊ नये, असे निर्देश खासदार नाना पटोले यांनी धरण विभागाला दिले होते. अन्यथा गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडून धरणातील साठवून ठेवलेले पाणी सोडण्यात येईल, असा गर्भित ईशारा खा.पटोले यांनी दोन वर्षांपूर्वी दिला होता. मात्र त्यानंतरही धरण विभागाने कोणतीही उपाययोजना केली नाही. परिणामी नदी पात्र प्रदूषितच राहिले. ‘नीरी’च्या अहवालाकडे डोळेझाक नागनदीच्या दूषित पाण्यामुळे गोसेखुर्द धरणातील पाणी आणि पवनी ते भंडारा तालुक्यापर्यंत वैनगंगा नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. या पाण्यातील रासायनिक घटकांमध्ये ‘स्लो पायझन’ आहे. परिणामी भंडारावासियांना चर्मविकारासह अन्य आजारांनी ग्रासले आहे. नागपूर येथील ‘नीरी’ या पर्यावरण संस्थेने भंडारा जिल्ह्याच्या भू-गर्भातील ८० टक्के पाणी असून पाणी आणखी प्रदूषित होऊ देऊ नका, असे अहवालात म्हटले होते. पोहणाऱ्यांनीही फिरविली पाठ दररोज सकाळी ५ ते ८ या वेळेत वैनगंगा नदीपात्रात पोहणाऱ्यांची खूप गर्दी असते. काही दिवसांपूर्वी नाग नदीच्या दूषित पाण्याचा जलतरणपटूंना त्रास होता. पाण्याच्या दुर्गंधीमुळे त्यांचे पोहणे बंद झाले होते. आता काही दिवसांपासून पाण्यावर तेलाचा तरंग असल्यामुळे जलतरणपटूंमध्ये कमालिचा असंतोष आहे. पोहण्यासाठी पूर्वीसारखी गर्दी अलिकडे मंदावली असल्याचे मागील अनेक वर्षांपासून नदीपात्रात नियमित पोहणारे डॉ. पुनम बावनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.